Uttar Pradesh | रस्त्यांवर सायकलींचं तितकच प्रमाण जितकं इतर वाहनाचं

महाराष्ट्रात सायकल या वाहनाचा काळ लोटून दशक ओलांडली आहे
Uttar Pradesh | रस्त्यांवर सायकलींचं तितकच प्रमाण जितकं इतर वाहनाचं
Uttar Pradesh | रस्त्यांवर सायकलींचं तितकच प्रमाण जितकं इतर वाहनाचंSaam Tv
Published On

सोनाली शिंदे

महाराष्ट्रात (Maharashtra) सायकल या वाहनाचा काळ लोटून दशक ओलांडली आहे, पण आजही उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) सायकल हेच महत्त्वाचे वाहन आहे. उत्तरप्रदेश आणि सायकलचं (bicycles) एक विशेष नातं आहे. त्यामुळेच राजकीय निवडणुकीतही (elections) सायकल चिन्हाला महत्त्व प्राप्त झाले आहे. विनाइंधन (fuel) आणि कमी खर्चात वापरता येणार मध्यमवर्गीय, गरीबांचं हे वाहन आहे. (Uttar Pradesh streets Bicycle Equally Proof vehicle)

हे देखील पहा-

साधारणपणे या साऱ्या पट्ट्यात मालवाहतुकीसाठी रेडा, घोडा, गाढव या जनावरांचा अधिकाधिक वापर करताना स्पष्ट दिसतो. या जनावरांवर आधारीत लाकडी गाड्या सर्रास दिसतात. खासगी कारखान्यात (factory) ऊस वाहून नेण्यासाठी, चारा किंवा इतर शेतमालासाठी या गाड्यांचा वापर होतो. तर सधन भागात मालवाहतुकीसाठी घरोघरी ट्रॅक्टर (Tractor) दिसतात. खासगी प्रवासी वाहतूक पाहिली तर सायकलचाच वापर सर्वाधिक होतो. इथला श्रमिक आणि शेतकरी (Farmers) वर्गाला आजही सायकलच सोयीची वाटते.

Uttar Pradesh | रस्त्यांवर सायकलींचं तितकच प्रमाण जितकं इतर वाहनाचं
Sangli: दुर्दैवी! विजेचा शॉक लागून मायलेकीचा मृत्यू; जत तालुक्यातील घटना

लोकांच्या सायकल प्रेमाची नस राज्यकर्त्यांना समजली नाही तर नवल, त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी १२ दिवसांची सायकल रॅली काढली. सायकल ट्रॅकच आश्वासन हे त्यावेळी निवडणुकीतल्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासन होते. त्यावर कोट्यावधी रुपयांचे बजेटही खर्च करण्यात आले आहे. या निवडणुकीतही सायकलचे चिन्हाचे झेंडे चौकाचौकात दिसत आहेत. एकूणच काय तर सायकल आणि उत्तरप्रदेशच्या माणसाचे नाते जरी जुने असले, तरी विकासाची गंगा येऊन कष्ट कमी होणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com