Water Heater Tips : सावधान ! वॉटर हीटर वापरताय? बादलीत पाणी तापवताना या गोष्टींची काळजी घ्या

Water Heater Blast : नुकतीच एक बातमीसमोर हिंगोलीतून समोर आली आहे. हीटरचा स्फोट झाला आहे.
Water Heater Tips
Water Heater TipsSaam Tv
Published On

Water Heater Rod : पाणी गरम करण्यासाठी बहुतेक लोकांकडे हीटर व गिजरचा वापर केला जातो. मात्र ही इलेक्ट्रीक उपकरणे वापरताना काळजी घ्यायला हवी. अन्यथा तुमच्यासोबत विपरीत घडू शकते.

नुकतीच एक बातमीसमोर हिंगोलीतून समोर आली आहे. हीटरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कुटुंबातील ५ जण भाजले आहेत. अनेकदा थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे सर्दी किंवा इतर आजार होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे आपण मिनिटांत पाणी गरम कसे होईल यावर अधिक भर देतो. परंतु, तुम्ही देखील पाणी (Water) गरम करण्यासाठी हीटर वापरताय तर या गोष्टींची काळजी (Care) घ्या

Water Heater Tips
Bike Engine Oil Tips: बाईकचे इंजिन ऑइल कधी बदलायचे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बसेल पैशांचा फटका !

1. कसे वापराल ?

वॉटर हीटरचा रॉड्स हा बराच काळ टिकतो. कितीही पाण्यात घातला तरी तो लवकर खराब होत नाही परंतु, दोन वर्षांपेक्षा अधिक जुना असणारा हिटर वापरु नये. कारण त्यातून निघणारा विद्युतप्रवाह अधिक वीज खेचण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपल्या शॉक लागण्याचा धोका असतो.

2. कधी चालू कराल?

अनेकदा आपण हीटरचा वापर करताना त्याचा रॉड हा चुकीच्या पद्धतीने वापर करतो. ते चालू केल्यानंतर बादलीमध्ये ठेवायला हवे. त्यासाठीत बादीलत पाणी असणे आवश्यक आहे. अन्यथा हीटरचा स्फोट होण्याची शक्यता अधिक असते.

Water Heater Tips
White Clothes Cleaning Hacks : पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग जात नाही ? मग या सोप्या टिप्स फॉलो करा, मिनिटात होतील नव्यासारखे

3. वेळोवेळी रॉड साफ (Clean) करा

वॉटर हीटरचा वापर केल्यानंतर वेळोवेळी रॉड स्वच्छ करा. खराब झाल्यानंतर रॉड जास्त पाणी गरम करत नाही परंतु, जास्त प्रमाणात वीज खेचली जाते. त्यासाठी रॉडला वेळोवेळी साफ करा

4. प्लास्टिकच्या बादलीचा वापर

वॉटर हीटरचा वापर करताना नेहमी प्लास्टिकच्या बादलीचा वापर करा. लोखंडी बादलीचा वापर केल्यानंतर शॉक लागण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी प्लास्टिकच्या बादलीचा वापर करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com