Upcoming Smartphones in August 2023: स्मार्टफोनप्रेमींसाठी ऑगस्ट महिना खूप जबरदस्त ठरणार आहे. जुलैप्रमाणेच ऑगस्टमध्येही अनेक दमदार स्मार्टफोन्सची बाजारात एंट्री होणार आहे. ऑगस्ट 2023 मध्ये जागतिक बाजारपेठेसोबतच भारतातही अनेक उत्तम स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत.
या आगामी स्मार्टफोन्सच्या यादीमध्ये Redmi, Motorola, OnePlus, आणि Samsung आणि इतर अनेक डिव्हाइसेसचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे पुढील महिन्यात Xiaomi आणि OnePlus चे फोल्डेबल फोन्सचेही अनावरण होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवस प्रतीक्षा करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यातच ऑगस्टमध्ये लॉन्च होणार्या या स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया.
Redmi 12 5G आणि Xiaomi मिक्स फोल्ड 3
नवीन Redmi 12 5G फोन 1 ऑगस्ट रोजी भारतात दाखल होईल. हा फोन चीनमध्ये लॉन्च झालेल्या Redmi Note 12R ची रिब्रँडेड आवृत्ती आहे. यामध्ये कंपनी 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देणार आहे. याशिवाय या फोनमध्ये Snapdragon 5 Gen 2 प्रोसेसर उपलब्ध असेल. (Latest Marathi News)
फोनचा डिस्प्ले 6.79 इंच आहे, जो फुल एचडी + रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूस तुम्हाला मजबूत ग्लास पॅनेल दिसेल. Xiaomi चा फोल्डेबल फोन- मिक्स फोल्ड 3 ऑगस्टमध्ये लॉन्च होण्यासाठी तयार आहे.
Samsung Galaxy F34 5G
या सॅमसंग फोनची यूजर्स आतुरतेने वाट पाहत आहेत. हा फोन 6000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. Fove मध्ये तुम्हाला 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी मिळेल. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. या आगामी फोनची मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर लाइव्ह झाली आहे. लवकरच त्याची लाँचिंग डेटही समोर येईल.
OnePlus चे दोन फोन होणार लॉन्च
OnePlus पुढील महिन्यात OnePlus Ace 2 Pro सोबत आपला पहिला फोल्डेबल फोन OnePlus Open लॉन्च करणार आहे. कंपनीचे दोन्ही आगामी फोन Snapdragon 8 Gen 2 चिपसेटवर काम करतील. OS बद्दल बोलायचे झाले तर कंपनी या फोन्समध्ये Android 13 वर आधारित ColorOS देणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.