Turmeric Applied Before Marriage : लग्नाआधी वर-वधूला या कारणामुळे लावली जाते हळद, जाणून घ्या कारणं

Haldi Ceremony : हिंन्दू धर्मात लग्ना अगोदर हळदीची परंपरा पार पडली जाते.
Turmeric Applied Before Marriage
Turmeric Applied Before MarriageSaam Tv

Why Turmeric Applied Before Marriage : हिंन्दू धर्मात लग्ना अगोदर हळदीची परंपरा पार पडली जाते. वर-वधूला भरभरून हळद लावली जाते. पण तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का ...?

लग्नामध्ये (Marriage) प्रत्येक परंपरेला महत्त्व दिले जाते परंतु हळदीचे (Turmeric) महत्व सर्वाधिक जास्त असते. भारतीय लग्नविवाह सोहळ्यात हळदीला महत्त्व पूर्ण परंपरेचा घटक मानला जातो. हि परंपरा पार पाडण्यासाठी चंदन, फुलाच्या पाकळ्या आणि पाणी एकवटून हे मिश्रण तयार केले जाते.

Turmeric Applied Before Marriage
Married Women Facts: नजरे मिलाना, नजरे चुराना ! विवाहित स्त्रीची परपुरुषाबद्दल शारीरिक भावना काय असते?

त्या नंतर हे मिश्रण वर-वधूच्या चेहऱ्यावर लावले जाते आणि पूर्ण शरीरावर सुद्धा लावले जाते. पण तुम्ही याचा कधी विचार केला आहे का, ही परंपरा का पार पडली जाते. हळद लावण्याचे काय फायदे आहेत. चला आम्ही तुम्हाला सांगतो की लग्नाअगोदर नवरा - नवरीला का लावली जाते हळद.

औषधी गुंनानपासून परिपूर्ण आहे हळद -

हळद स्वयंपाकघरात आढळून येणारी फक्त एक मसाला नाही आहे, तर हळदमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म अढळून येतात जे निस्तेज त्वचेवर चमकदारपणा घेऊन येण्याचे काम करतात . त्याचबरोबर हळद इन्फेकेशन थांमबवते आणि जंतू देखील नाहीसे करते.

Turmeric Applied Before Marriage
Health Benefits To Wearing Bangles : बांगड्या केवळ सौंदर्याचे अलंकार नाही, तर आरोग्यासाठीही आहेत फायदेशीर !

चेहऱ्यावर येते टवटवी -

पूर्वीच्या काळात चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी आयुर्वेदिक पद्धथीचा वापर केला जात होता. जेव्हा गोष्ट चेहऱ्याच्या सुंदरतेची असेल तर हळदीला कोण मागे ठेवेल. हळद चेहऱ्याबरोबर पूर्ण शरीरावर टवटवीतपणा घेऊन येते. यामुळे लग्नाअगोदर नवरा - नवरीला हळद लावली जाते.

त्वचा असते डिटॉक्स -

लग्ना अगोदर नवीन जोडप्याला हळद लावली जाते कारण त्यांचे शरीर डिटॉक्स व्हावे म्हणून. हळद लावल्यानंतर तुम्ही अंघोळ करता तेव्हा तुमचे शरिर डिटॉक्स होते आणि जंन्तू निघून जातात.

खुद्र्या त्वचासाठी उपयुक्त -

खुद्र्या आणि कठोर त्वचेसाठी हळद अतिशय फायदेशीर असते. खुद्र्या आणि कठोर त्वचेसाठी हळद नक्कीच लावली पाहिजे. अश्या व्यक्तींसाठी हळद औषधापेक्षा कमी नाही. हळदीने त्वचेला ओलसरपणा आणि पोषण मिळते. हळदीने सुरकुत्या भरून निघतात. तुम्ही लग्नाव्यतिरिक्त कोणत्याही दिवशी हळद वापरून त्वचेला मुळापासून हाइड्रेट करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com