Tulsi Vivah 2023 : आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात, १ तासाचा शुभ मुहूर्त, पूजा कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

Tulsi Vivah 2023 Puja Vidhi : हिंदू पंचागानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाह केला जातो.
Tulsi Vivah 2023
Tulsi Vivah 2023Saam Tv

Tulsi Vivah 2023 Shubh Muhurat :

हिंदू पंचागानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. या दिवसापासून तुळशीच्या लग्नला सुरुवात होते. यंदा हा दिवस २४ नोव्हेंबरपासून साजरा केला जाणार आहे.

शुक्ल पक्षातील कार्तिक एकादशीला देवउठणी एकादशीचा उपवास केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी देवी आणि शालिग्राम देवताचा शुभ विवाह केला जातो. तुळशी विवाह केल्याने जितके पुण्य मिळते तितकेच कन्यादानातून पुण्य मिळते असे म्हटले जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. शुभ मुहूर्त कधी?

तुळशी विवाहाच्या दिवशी द्वादशी तिथी ही २३ नोव्हेंबरला रात्री ०९.०१ मिनिटांनी सुरु होईल आणि २४ नोव्हेंबर सायंकाळी ०७.०६ मिनिटांनी समाप्त होईल. परंतु, उदयतिथीनुसार २४ नोव्हेंबरला तुळशी विवाह (Marriage) केला जाईल.

Tulsi Vivah 2023
Tulsi Vivah 2023 : तुळशी विवाहाच्या दिवशी करू नका ही कामं, या पद्धतीने करा पूजा, लगेच मिळेल फळ!

2. शुभ योग

यंदा तुळशी विवाहासाठी २ शुभ मुहूर्त आहेत. सकाळी ११.२८ ते दुपारी १२.११ पर्यंत तर दुसरा शुभ मुहूर्त हा ०१.३७ ते २.२० पर्यंत असेल. तसेच सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योगात तुळशी विवाह केला जाईल.

सर्वाथ सिद्धी योग - दिवसभर

अमृत सिद्धी योग - आज सकाळी ०६.५१ ते ०४.०१ पर्यंत असेल.

3. पूजा विधी

तुळशीचे लग्न हे ऊसासोबत लावले जाते. शालिग्राम देवताला यावेळी ऊस म्हणून संबोधले जाते. एका बाजूला तुळशीला संपूर्ण वधूच्या रुपात सजवून दुसऱ्या बाजूला शालीग्राम देवतेला उभे केले जाते. त्याच्या शेजारी पाण्याने (Water) भरलेला कलश आणि पाच आंब्याची पाने ठेवावी. तुळशीच्या भांड्यात गेरु लावून तुपाचा दिवा ठेवावा. तुळशी आणि शालिग्राम देवतेला चंदन लावून मंगालष्टके बोलून सात वेळा शालिग्राम हातात घेऊन प्रदक्षिणा घातली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com