Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी लाल चंदनाचा हा उपाय करून पाहाच; बिघडलेली सर्व कामं होतील

Remedies to change luck: प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला आणि ग्रहाला समर्पित असतो. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो आणि सूर्य हा यश, आरोग्य, ऊर्जा आणि सन्मानाचा कारक आहे.
Sunday che Upay
Sunday che Upaysaam tv
Published On

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा एखाद्या विशिष्ट देवतेला समर्पित केलेला असतो. त्याप्रमाणे रविवार हा दिवस सूर्यदेवतेच्या पूजनासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. ज्यांच्यावर सूर्यदेव प्रसन्न होतात, त्यांच्या आयुष्यात यश, धन, आरोग्य आणि समाधान आपोआप येऊ लागते.

रविवारच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्यासोबत काही सोपी पण प्रभावी उपाय केल्यास अनेक अडथळ्यांना दूर करता येणं शक्य असतं. जाणून घेऊया असे कोणते उपाय आहेत जे रविवारच्या दिवशी केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो.

यश आणि किर्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

रविवारच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून शुद्ध मनाने सूर्यदेवाला तांब्या किंवा पितळेच्या भांड्यातून जल अर्पण करा. या वेळी तुम्ही सूर्याला नमस्कार करत “ॐ सूर्याय नमः” असा जप करत अर्ध्य दिल्यास, तुमच्या कार्यात यशाची हमी मिळते.

कामात यश मिळवसाठी विशेष उपाय

रविवारच्या दिवशी लाल चंदनाचा तिलक कपाळावर लावल्यास तो दिवस शुभ ठरू शकतो. विशेषतः जर काही महत्त्वाचं काम असेल तर तिलक करून बाहेर पडल्यास त्या कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. हा एक साधा पण प्रभावी उपाय मानला जातो.

लाल कपडे परिधान करा

रविवारी लाल रंगाचे कपडे घालून घराबाहेर पडल्यास तुमच्या कामात सकारात्मकता येते. याशिवाय तुमच्या आयुष्यात तसंच कामात असलेले अडथळे दूर होतात. लाल रंग हा उर्जा आणि आत्मविश्वासाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे सूर्योपासनेसाठी हा रंग योग्य ठरतो.

लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा

रविवारच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तुपाचे दिवे लावा. यामुळे सूर्यदेव आणि लक्ष्मीमातेचा कृपाशीर्वाद मिळतो. घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.

Sunday che Upay
Laxmi Narayan Rajyog: चंद्राच्या राशीमध्ये बनणार लक्ष्मी नारायण योग; धनलाभास करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

इच्छा पूर्ण होण्यासाठी

जर एखादी इच्छा बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिली असेल तर रविवारी बरगदाच्या झाडाचं एक पान घ्या, त्यावर तुमची इच्छा लिहा. यानंतर हे पान नदीमध्ये सोडा. हा उपाय विश्वासाने केला, तर सूर्यदेव इच्छापूर्ती करतात असं मानलं जातं.

Sunday che Upay
Shukra Gochar: 12 महिन्यांनी शुक्र करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचं नशीब चमकून पैसे मिळणार

सुख-समृद्धीसाठी खास उपाय

रविवारच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ गव्हाच्या पीठापासून चौमुखी दिवा बनवा आणि त्यात तेलाने चार वात लावून दिवा पेटवा. हा उपाय केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनलाभ वाढतो, असं मानलं जातं.

Sunday che Upay
Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com