Travel Facts : 'हे' ठिकाण आहे भारतातील सगळ्यात शेवटचे, दृश्य तर अगदी सुंदर

भारत हा निसर्गाने व विविधतेने नटलेला देश आहे.
Travel Facts
Travel FactsSaam Tv
Published On

Travel Facts : भारतातील अशी अनेक ठिकाण आहेत जी पर्यटकांचे मन मोहून टाकतात. भारत हा निसर्गाने व विविधतेने नटलेला देश आहे. त्यातील एक सुंदर असा भाग दक्षिण भारतातला. दक्षिण भारत (India) आपल्या सुंदर दृश्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येतात.

दक्षिण भारतात अशी काही ठिकाणे आहेत जी सुंदर असण्यासोबतच इतर ठिकाणांपेक्षा खूप वेगळी मानली जातात. यापैकी एक भारतातील शेवटचा रस्ता आहे, जो सध्या तामिळनाडूमध्ये आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताचा शेजारी देश श्रीलंका येथून सहज दिसतो. ऑफबीट डेस्टिनेशन असल्याने पर्यटकांना ते खूप आवडते. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल

Travel Facts
Solo Travel Trip : बजेटमध्ये प्लान करा, सोलो ट्रिप !

हा आहे भारतातील शेवटचा रस्ता

Dhanushkodi
DhanushkodiCanva

तमिळनाडूच्या दक्षिण-पूर्वेस असलेला धनुषकोडी. हे रामेश्वरम बेटाच्या किनाऱ्यावर वसलेले आहे आणि भारत-श्रीलंकेची भूसीमा म्हणून ओळखले जाते. त्याचे क्षेत्रफळ फक्त 50 यार्ड आहे आणि त्याच्या पायथ्याशी वाळूचा ढीग आहे, परंतु त्याचे सौंदर्य मन मोहित करते. हे ठिकाण बऱ्याच काळापासून निर्जन होते. पर्यटकांसाठी एखाद्या ऑफबीट डेस्टिनेशनपेक्षा कमी नाही.

धनुषकोडीशी संबंधित रहस्यमय गोष्टी

एक उत्तम पर्यटन (Travel) स्थळ मानल्या जाणाऱ्या धनुषकोडीचा बहुतांश भाग अजूनही निर्जन आहे. पूर्वी घरे, रुग्णालये, हॉटेल, पोस्ट ऑफिस अशी सार्वजनिक ठिकाणे असायची, पण काही वर्षापूर्वी आलेल्या चक्रीवादळामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले. येथे 1500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून या ठिकाणचा बहुतांश भाग निर्जन दिसतो.

त्याचा संबंध प्रभू रामाशी आहे

धनुषकोडीचे स्थान रामेश्वरमपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते भगवान रामाशी संबंधित असल्याचे मानले जाते. असे म्हणतात की रामायण काळात भगवान रामाने हनुमानजींना या ठिकाणी राम सेतू बांधण्याचा आदेश दिला होता. असे मानले जाते की माता सीतेला लंकेतून मुक्त केल्यानंतर भगवान रामाने आपल्या धनुष्याच्या एका टोकाने राम सेतू तोडला, म्हणून या स्थानाला धनुषकोडी म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com