Indian Railways : रेल्वे प्रवासात संकट ओढावल्यास चैन ओढण्याऐवजी वापरा 'हे' पर्याय

रेल्वे प्रवास करताना अचानक कोणतीही वैद्यकीय अडचण आल्यास, वस्तू चोरीला गेल्यास किंवा अन्य कोणतीही समस्या असल्यास सर्वात आधी 'अलार्म चेन' ओढण्याचाच विचार येतो. मात्र, साखळी ओढणे हा योग्य पर्याय नाही.
Use 'these' simple options if you face a crisis while traveling by train
Use 'these' simple options if you face a crisis while traveling by trainsaam tv
Published On: 

रेल्वे प्रवासादरम्यान विनाकारण किंवा अयोग्य कारणासाठी रेल्वेची साखळी ओढल्यास रेल्वे कायद्यानुसार मोठा दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय, साखळी ओढल्यामुळे ट्रेन मध्यभागीच कुठेतरी थांबते, ज्यामुळे मदत पोहोचण्यास जास्त वेळ लागू शकतो. भारतीय रेल्वेने प्रवाशांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी काही अत्यंत सोप्या यंत्रणा तयार केल्या आहेत. यावेळेस साखळी ओढण्याव्यतिरिक्त तुमच्याकडे कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात जाणून घ्या.

139 नंबर डायल करा

हा भारतीय रेल्वेचा 'वन स्टॉप सोल्यूशन' नंबर आहे. प्रवासादरम्यान कोणतीही वैद्यकीय आणीबाणी आल्यास किंवा सुरक्षेशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास तुमच्या फोनवरून लगेच 139 डायल करा. तुमचा कॉल थेट रेल्वेच्या कंट्रोल रूममध्ये जोडला जाईल. तुम्हाला फक्त तुमचा PNR नंबर आणि अडचण सांगावी लागेल. ट्रेन पुढील स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच डॉक्टर किंवा पोलीस तुमच्या मदतीसाठी प्लॅटफॉर्मवर तयार असतील.

Use 'these' simple options if you face a crisis while traveling by train
औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

रेल मदत ॲप

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. प्रवासाला निघण्यापूर्वी फोनमध्ये 'Rail Madad' हे ॲप नक्की डाऊनलोड करून ठेवा. या ॲपद्वारे तुम्ही कोणालाही कॉल न करता तुमची तक्रार नोंदवू शकता. तसेच यात फोटो अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. PNR नंबरसह तक्रार नोंदवताच रेल्वेची यंत्रणा तुमची लोकेशन ट्रॅक करते आणि त्वरित कारवाई सुरू केली जाते.

TTE आणि RPF जवानांची थेट मदत

प्रत्येक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल ट्रेनमध्ये टीटीई (TTE) आणि रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) जवान असतात. कोणत्याही अडचण आल्यास वेळीच तुम्ही त्यांना शोधून आपली समस्या सांगू शकता. या कर्मचाऱ्यांकडे 'वॉकी-टॉकी' असतात, ज्याद्वारे ते थेट ट्रेनचे गार्ड, ड्रायव्हर किंवा पुढील स्टेशनच्या स्टेशन मास्टरशी संपर्क साधून तुमच्यासाठी तात्काळ मदतीची सोय करू शकतात.

सोशल मीडियाची मदत

तुम्ही इंटरनेट वापरत असाल, तर 'X' पूर्वीचे Twitter हा प्लॅटफॉर्म खूप उपयुक्त ठरू शकतो. तुमची समस्या, ट्रेन नंबर, कोच आणि PNR नंबर लिहून @RailwaySeva ला टॅग करून पोस्ट करा. रेल्वेची सोशल मीडिया टीम २४ तास सक्रिय असते. काही मिनिटांतच तुम्हाला तिथून प्रतिसाद मिळेल आणि तुमच्या सीटपर्यंत मदत पोहोचवली जाईल.

Use 'these' simple options if you face a crisis while traveling by train
Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; सुरत एक्सप्रेसमधून २ आरोपींना घेतलं ताब्यात

नवीन गाड्यांमधील 'इमरजन्सी टॉकिंग-बॅक' (Emergency Talk-Back) बटण

भारतीय रेल्वे आता वेगाने बदलत आहे. तुम्ही वंदे भारत, नवीन EMU किंवा मेट्रो ट्रेनमधून प्रवास करत असाल, तर तिथे जुन्या साखळीऐवजी 'इमरजन्सी टॉकिंग-बॅक' (Emergency Talk-Back) बटण देण्यात आले आहेत. हे बटण दाबल्यास ट्रेन थांबत नाही, तर तुमचे थेट बोलणे ट्रेनचे लोको पायलट किंवा गार्डशी होते. तुम्ही त्यांना तुमची अडचण सांगू शकता आणि ते लगेचच परिस्थिती हाताळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com