Toyota Innova Hycross : टोयोटाच्या 'या' 7 सीटर कार विक्रीत तेजी; 23 किमी मायलेज, जबरदस्त फीचर, किंमत फक्त...

Toyota Innova Hycross Features : टोयोटा किर्लोस्कर मोटारच्या इनोव्हा हायक्रॉसने एक नवीन टप्पा गाठला आहे. कंपनीच्या या लोकप्रिय MPV ने ५० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठला. याची विक्री २०२२ मध्ये सुरु झाली होती.
Toyota Innova Hycross
Toyota Innova HycrossSaam tv

Toyota Innova Hycross Price :

मागच्या वर्षी टोयोटाने भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त ७ सीटर कार लॉन्च केली होती. टोयोटाची नवी कार मारुती सुझुकीच्या Maruti Ertiga सारखीच आहे.

अशातच टोयोटा किर्लोस्कर मोटारच्या इनोव्हा हायक्रॉसने एक नवीन टप्पा गाठला आहे. कंपनीच्या (Company) या लोकप्रिय MPV ने ५० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठला. याची विक्री २०२२ मध्ये सुरु झाली होती.

1. सर्वाधिक विक्री का?

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस TNGA प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये शिडी-ऑन-फ्रेमऐवजी MPV मध्ये मोनोकोक बॉडी आहे. इनोव्हा हायक्रॉसमध्ये सेगमेंट-फर्स्ट पॅडल शिफ्टर्स, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि एलईडी डीआरएल यांसारखी अनेक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Toyota Innova Hycross
WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅपचं भन्नाट फीचर! एकाच फोनमध्ये वापरता येणार दोन अकाउंट्स, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

2. किंमत किती?

Innova HyCross ची किंमत १९.७७ लाख ते ३०.६८ लाख रुपये (Price) (एक्स-शोरूम, दिल्ली)च्या मध्ये आहे. ऑटोमेकरने याचे संपूर्ण श्रेय MPV च्या सेवा आणि वॉरंटीला दिले आहे. कंपनी या मॉडेलवर 3 वर्षे/100,000 किमीची वॉरंटी देते आणि ती 5 वर्षे/220,000 किमीपर्यंत वाढवण्याचा पर्यायही दिला आहे. कारची हायब्रिड बॅटरी ८ वर्षे/160,000 किमीच्या वॉरंटीसह येते.

3. दमदार इंजिन

इनोव्हा हायक्रॉसमध्ये डिझेलसाठी हायब्रिड इंजिनसाठी मोठी सुधारणा कंपनीने केली आहे. ही कार (Car) 183 bhp च्या आउटपुटसाठी इलेक्ट्रिक मोटरसह जोडण्यात आली आहे. ज्यामुळे इंधनची कार्यक्षमता सुधारते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com