Dirty towels: टॉवेल किती दिवसांनी धुवावा? अस्वच्छ टॉवेल वापरल्याने तुम्हालाही होतील हे आजार

clean your towel: आपला टॉवेल प्रत्येक दिवशी धुणे ही सवय तुम्हाला अनेक त्वचेसंबंधीत आजारांपासून वाचवते.
Dirty towels
clean your towelsaam tv
Published On

तुम्ही रोज अंघोळ म्हणजेच रोज टॉवेल वापरता. वापरेला टॉवेल तुम्ही पुन्हा वाळवून वापरता. पण तुम्हाला माहित का? वापरलेल्या टॉवेलवर बॅक्टेरिया आणि फंगस असू शकतात. त्यामुळे तुम्हाला त्वचेचे आजार उत्भवू शकतात. आपला टॉवेल प्रत्येक दिवशी धुणे ही सवय तुम्हाला अनेक त्वचेसंबंधीत आजारांपासून वाचवते. तुम्ही जेवढी स्वच्छता राखाल तेवढे तुम्ही आजारांपासून लांब राहाल.

रोज टॉवेल धुण्याचा फायदे

टॉवेल तुम्ही वापरल्यावर ओला होतो. म्हणजेच तुमच्या शरीरातील तेल त्यात जाते. त्यामुळे बॅक्टेरिया, फंगस असे अनेक डोळ्यांना न दिसणारे सुक्ष्म जीवाणू टॉवेलमध्ये जमा होतात. तसेच तुम्ही अंघोळ केल्यावर अंग पुसता तेव्हा तुम्ही कोरडे होता. त्यावेळ तुमच्या शरीरावरील मृत पेशी, घाम, नैसर्गिक तेल हे जीवाणू तुमच्या टॉवेलला चिकटू शकतात.

Dirty towels
Diwali Faral Recipe : फक्त १० मिनिटांत करा ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत चकली

टॉवेल आठवडाभर न धुतल्याने काय परिणाम होतात?

तुम्ही टॉवेल न धुता वापरल्याने बॅक्टेरिया हे ओलसर उबदार वातावरण वाढतात. त्याने तुम्हाला इन्फेक्शन, खाज किंवा पुरळ येवू शकते. त्याचसोबत बुरशी ही न धुतलेल्या टॉवेलवर वाढू शकते. या संक्रमणांमुळे त्वचेला खाज सुटणे, लालसरपणा येणे असे आजार होवू शकतात. तुमच्या टॉवेलवर घाण, घाम आणि तेल साचल्यावर तुमच्या शरीरावर रॅशेस, पुरळ येवू शकतात त्याने फॉलिक्युलायटिस म्हणतात. तसेच टॉवेल न धुतल्याने त्यातुन घाणेरडा वास येवू शकतो.

टॉवेल किती वेळा धुवायचा?

तुम्ही ओला किंवा कोणी वापरलेला टॉवेल वापरु नका. त्याने त्यांच्या त्वचेवरील जिवाणू तुमच्या त्वचेला चिकटू शकतात. त्याने तुमच्या शरीरावर पुरळ, डाग येवू शकतात. तर तज्ञांच्या मते तु्म्ही किमान २ ते ३ तीन दिवसांनी टॉवेल स्वच्छ धुवा आणि उन्हात वाळवा. ही पद्धत फॉलो केल्याने तुम्ही हानिकारक बॅक्टेरिया, फंगस आणि तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करु शकणाऱ्या इतर त्रासांपासून मुक्त राहाल.

Edited By: Sakshi Jadhav

Dirty towels
Happy Life: आनंदी राहण्यासाठी करा 'या' टीप्स फॉलो

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com