सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहिलेले नाही. रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक व्यक्तींना घरचं जेवणही मिळत नाही. त्यामुळे विविध फास्ट फूड्सचा आहारात जास्त समावेश होतो. याने व्यक्तीच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. आजकाल अगदी तरुण आणि लहान वयोगटातील मुला-मुलींना देखील हृदयविकारच्या समस्यांचा सामना करावा लागतोय.
फास्टफूड आणि तेलात तळलेले पदार्थ शक्यतो टाळावेत असे पदार्थ खाल्याने व्यक्ती आजारी पडतात. रुग्णालयात दाखल केल्यावर या व्यक्तींना पाहण्यासाठी आलेले नातेवाईक फळे घेऊन येतात. रुग्णासाठी फळे आणतात आणि स्वत: पुन्हा रुग्णालयाबाहेर असलेल्या कॅन्टीनमध्ये वडे, पॅटीस असे तळलेले फास्ट फूड खातात. फास्ट फूड खाण्याचं प्रमाण आता फार वाढलंय. त्यामुळे हृदयविकाराचे आजारही वेगाने वाढतायत.
हृयदयविकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही टीप्स फॉलो करायला हव्यात. त्या टीप्स कोणत्या आहेत हे जाणून घेऊ.
किती खावे?
अनेक जण भूक नसतानाही वेळ झाली तर दोन घास खाऊन घेऊ असं म्हणतात. जेवण हे भूक लागल्याशिवाय करू नये. जेवताना तेलकट पदार्थ फक्त आठवड्यातून एकदाच खावेत. जेवताना लहान प्लेट घ्यावी. जास्त ताट भारून घेऊनये. जेवताना अगदी पोट टम्म फुगेपर्यंत खाऊनका. हृदयविकाराच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी नेहमीच पूर्ण पोट भरेपर्यंत जेवण करू नका.
कोणती फळे खावीत?
मार्केटमध्ये सध्या अनेक विविध प्रकारची फळे आली आहेत. लिची, ड्रायगन फ्रूट अशी याआधी न ऐकलेली फळे बाजारात आलीत. जर तुम्ही ही फळे खात असाल तर त्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आधी माहिती करून घ्या. फळांचे सेवन करताना ऋतूनुसार करावे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये येणारी फळे त्या त्या हृतूमध्येच खावीत.
ब्रेड
ब्रेड आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी फार घातक असतात. हे पदार्थ पचनासाठी जड असतात त्यामुळे यांचे सेवन करू नये. जर तुम्ही नॉनवेज लव्हर आहात तर मासे किंवा चिकन, मटन शक्यतो रात्रीच्यावेळी खाणे टाळावे. कारण रात्री मांसाहार केल्यामुळे त्याचे पचन होत नाही. परिणमी विविध आजर जडतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.