Health Alert: 'या' पदार्थांपासून सावध राहा, वयाआधीच हाडे करतात कमजोर

Health Care Tips: शरीरातील कॅल्शियमचे योग्य प्रमाण टिकवणे हाडांसाठी आवश्यक आहे, पण काही पदार्थ कॅल्शियमचे शोषण कमी करून त्याची कमतरता निर्माण करतात. या पदार्थांमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात.
Health Alert
Health AlertYandex
Published On

कॅल्शियम हे शरीरसाठी अत्यावश्यक खनिज असून हाडे आणि दात मजबूत ठेवणे, स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवणे आणि मज्जासंस्थेचे आरोग्य टिकवणे यासाठी ते महत्त्वाचे आहे. मात्र काही विशिष्ट अन्नपदार्थ शरीरातील कॅल्शियम शोषणात अडथळा निर्माण करतात किंवा कॅल्शियमची कमतरता वाढवू शकतात. अशा पदार्थांचे सेवन हाडांच्या आरोग्यावर परिणाम करु शकते. हाडांसाठी हानिकाकर अशा कॅल्शियम कमी करणाऱ्या पाच प्रमुख पदार्थांबद्द अधिक जाणून घेऊया.

Salt
SaltYandex

मीठ

जास्त मीठ खाणे शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण करू शकते. सोडियमयुक्त पदार्थ, जसे की चिप्स, प्रक्रिया केलेले अन्न आणि फास्ट फूड, जास्त प्रमाणात खाल्ल्यास, मूत्रपिंड कॅल्शियम बाहेर टाकते. यामुळे हाडांची घनता कमी होते आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी मीठाचे सेवन मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. संतुलित आहार आणि सोडियमयुक्त पदार्थ कमी खाल्ल्यास हाडे मजबूत राहण्यास मदत होते.

Health Alert
Health Care Tips: रात्री झोपण्यापूर्वी हात-पाय धुण्याचे फायदे, तुम्ही 'या' अनेक आजारांपासून राहाल दूर
Caffeinated Drink
Caffeinated DrinkYandex

कॅफिनयुक्त पेये

कॅफिनयुक्त पेये जसे की कॉफी, चहा आणि एनर्जी ड्रिंक्स यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियम शोषणावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कॅफिनमुळे कॅल्शियमचे नुकसान वाढून ते मूत्राद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते, ज्यामुळे हाडे कमजोर होण्याचा धोका वाढतो. कॅफिनयुक्त पदार्थांचा आनंद घेताना प्रमाणावर लक्ष द्या आणि आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. संतुलित आहार आणि नियंत्रित कॅफिन सेवन हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

Health Alert
Nail Care Tips: जेल नेल पॉलिशच्या वापराचे आरोग्यावर होतात दुष्परिणाम, जाणून घ्या काळजी घेण्याचे उपाय
Soft Drink
Soft DrinkYandex

सॉफ्ट ड्रिंक्स

सॉफ्ट ड्रिंक्स आणि कार्बोनेटेड पेयांमध्ये असलेले फॉस्फोरिक अ‍ॅसिड शरीरातील कॅल्शियमची पातळी घटवते. हे आम्ल कॅल्शियमसोबत जोडून असे संयुग तयार करते जे शरीराला शोषता येत नाही. शीतपेयांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हाडांची घनता कमी होऊन हाडे कमजोर होतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक्स मर्यादित प्रमाणात प्या आणि कॅल्शियमयुक्त आहाराचा समावेश करा. संतुलित आहार आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे नियंत्रित सेवन हाडांसाठी फायदेशीर ठरते.

High protein diet
High protein dietYandex

उच्च प्रथिनेयुक्त आहार

प्रथिने शरीरासाठी आवश्यक असली तरी त्याचे अतिप्रमाणात सेवन कॅल्शियम शोषणावर नकारात्मक परिणाम करू शकते. जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ, जसे की लाल मांस, अंडी आणि प्रथिने पूरक आहार, शरीरातील आम्ल पातळी वाढवतात. या आम्ल पातळीचे संतुलन राखण्यासाठी शरीर कॅल्शियमचा वापर करते, ज्यामुळे हाडांमधील कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते. हाडांच्या आरोग्यासाठी प्रथिने प्रमाणित प्रमाणात घेणे आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे, ज्यामुळे हाडे मजबूत राहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com