रस्त्यावरुन धावताना वाहन होणार चार्ज, काय आहे Wireless Charging टेक्नोलॉजी

Electric Vehicle : देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने सतत चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनही वेगाने तयार केले जात आहेत. अशा स्थितीत, जर तुम्हाला कोणी सांगितले की आता रस्त्यावरून धावताना इलेक्ट्रिक वाहन आपोआप चार्ज होईल,.
Wireless Charging For EV
Wireless Charging For EVSaam Tv
Published On

Wireless Charging Technology :

देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने सतत चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनही वेगाने तयार केले जात आहेत. अशा स्थितीत, जर तुम्हाला कोणी सांगितले की आता रस्त्यावरून धावताना इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) आपोआप चार्ज होईल, तर प्रथम तुम्हाला तो विनोद वाटेल आणि नंतर तुम्ही मोठ्याने विचाराल की हे कसे शक्य होईल?

वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान कसे कार्य करेल?

Fiat आणि Peugeot ची मूळ कंपनी Stellantis द्वारे वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी अलीकडे इटलीमध्ये प्रदर्शित केले आहे. या टेक्नोलॉजीमध्ये पॉवर ग्रीडमधून रस्त्याखाली टाकलेल्या कॉपर कॉईलमध्ये वीज ट्रान्सफर केली जाईल. या तांब्याच्या कॉइल्स विजेवर EV चार्ज होतील.

अशा स्थितीत या रस्त्यावरून कोणतीही ईव्ही जात असल्यास, तांब्याच्या कॉईलच्या संपर्कात आल्यानंतर ती वायरलेस टेक्नोलॉजीच्या मदतीने आपोआप चार्ज होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की कॉपर कॉइलसह 1 किमीचा रस्ता तयार करण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च येईल आणि प्रति किमी 48 टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्समध्येही या टेक्नोलॉजीवर काम सुरू आहे.

Wireless Charging For EV
Car Care Tips : कारमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवताय? चुकूनही दुर्लक्ष करू नका

कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?

रस्त्यावरून जाताना इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्याची सुविधा प्रथम केरळमध्ये सुरू होणार आहे. यासाठी केरळ सरकार पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. या प्रकल्पात केरळ सरकार (Government) रस्त्याखाली तांब्याचे कॉइल टाकणार आहे, ज्याद्वारे इलेक्ट्रिक वाहने वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजीच्या मदतीने आपोआप चार्ज होतील.

Wireless Charging For EV
Car Care Tips : मुलांनी कारची सीट घाण केली आहे? या भन्नाट टीप्स फॉलो करा, झटक्यात होईल साफ

हे तंत्रज्ञान कधी सुरू होणार?

केरळ सरकारच्या ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव केआर ज्योती लाल यांनी सांगितले की, पुढील वर्षीपासून राज्यात ड्राइव्ह आणि चार्ज प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, केरळ सरकार वाहन ते ग्रीड टेक्नोलॉजीचे काम करण्याचा विचार करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com