Chicken Tikka Masala : मजबूरीने बनवलेली डिश झाली जगभर प्रसिद्ध, किस्साही भन्नाट!

हॉटेलमध्ये गेल्यानंतर आवडीने आपल्याला हवी ती डिश मागवतो व त्याची चवही चाखतो.
Chicken Tikka Masala
Chicken Tikka Masala Saam Tv
Published On

Chicken Tikka Masala : भारतात बऱ्यापैकी नॉनव्हेज प्रेमी आहेत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आवडीने आपल्याला हवी ती डिश मागवतो व त्याची चवही चाखतो. त्यातीलच एक चिकन टिक्का मसाला. याची चवही आपण चाखली असेलच. मांसाहार प्रेमींना चिकन टिक्का मसाल्याची चव आवडते, लोक तो चवीचवीने खातात.

चिकन टिक्का मसाला रेसिपी शोधण्याचे श्रेय स्कॉटिश शेफ अली अहमद यांना जाते. अली अहमदने तो पहिल्यांदाच बनवला असल्याचे म्हटले जाते. नुकतेच त्याचे निधन झाले पण तुम्हाला माहित आहे का ? चिकन टिका मसाला ही रेसिपी त्यांनी मजबूरीमध्ये बनवली होती. चला जाणून घेऊया त्याबद्दल.

Chicken Tikka Masala
Chicken Tikka Recipe Inventor Death : चिकन टिक्का मसाला रेसिपी बनवणारे शेफ अली अहमद याचे निधन

चिकन टिक्का मसाला बनवण्याची कल्पना कशी सुचली?

  • अली अहमद यांनी १९७० मध्ये पहिल्यांदा चिकन टिक्का मसाल्याची रेसिपी बनवली होती.

  • ही रेसिपी पहिल्यांदा त्यांनी शीश महल या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाच्या तक्रारारी नंतर बनवली गेली होती.

  • सूपपासून बनवलेल्या सॉस किंवा चटणीमध्ये सुधारणा करून या डिशचा शोध लावला गेला. असे अहमद यांनी सांगितले होते.

  • जेव्हा एका ग्राहकाने चिकन टिक्का खाताना सॉस ऑर्डर केला आणि चिकन टिक्का खूप कोरडा असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्या समोर असणाऱ्या दही, मलई आणि मसाल्यांच्या सॉसमध्ये चिकन टिक्का शिजवण्यास सुरुवात केली.

Chicken Tikka Masala
Chicken Tikka MasalaSaam Tv
  • मजबूरीमध्ये बनवलेली ही डिश इतकी प्रसिद्ध झाली की, आज त्याची चव चाखण्यास लोक तऱ्हे तऱ्हेचे प्रयत्न करतात.

  • या चिकन टिक्का मसालाचा शोध लागला आणि लवकरच चिकन टिक्का मसाला जगभर प्रसिद्ध झाला.

  • 2009 मध्ये एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अली अहमद यांनी सांगितले की, चिकन टिक्का मसाला (Spices) ग्राहकांच्या चवीनुसार बनवला जातो. ते म्हणाले की, ग्राहकांना गरम करीसोबत खायला आवडत नाही, म्हणून चिकन टिक्का मसाला हा दही आणि मलईचा सॉस वापरून बनवला जातो.

  • अशाप्रकारे चिकन टिक्क्याचा शोध लागला व जगभर (World) प्रसिद्ध झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com