Tea Leaves Adulteration : तुम्ही वापरत असलेली चहा पावडर नकली आहे की असली; या टिप्सने मिनिटांत समजेल भेसळ

Testing Tea Leaves Adulteration : चहा पावडरमध्ये असलेली भेसळ कशी ओळखायाची याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Testing Tea Leaves Adulteration
Tea Leaves AdulterationSaam TV
Published On

सध्या महागाईचा भडका उडाला आहे. त्यात खाण्यापीण्याच्या अनेक पदार्थांमध्ये भेसळ आढळून येत आहे. पदार्थांमध्ये भेसळ असल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. दूध, तांदूळ, डाळी, तूप अशा सर्वच पदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे. यातील भेसळयुक्त पदार्थ ओळखणे प्रत्येकासाठी कठीण असते.

Testing Tea Leaves Adulteration
Special Report: तुम्ही खाताय भेसळयुक्त मिठाई? सणासुदीला तुमच्या आरोग्याशी खेळ

अशात सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवातच आपण चहाने करतो. चहा प्यायल्याने आपल्याला तंदुरुस्त वाटतं. तर आयुष्यातील सर्व आळस आणि तणाव दूर जातो, आपल्याला अगदी फ्रेश फिल होतं. आता तुम्ही पित असलेला चहा भेसळयुक्त आहे असं समजलं तर? बाजारात सध्या बरेच भेसळयुक्त चहापावडर आल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भेसळ असलेली चहापावडर कशी ओळखायची याची माहिती सांगणार आहोत.

कलर टेस्ट

चहा पावडरची शुद्धता आणि चहा पावडरचा दर्जा तपासण्यासाठी तुम्ही सर्वात आधी त्याचा रंग पाहा. त्यासाठी तुम्हाला एका काचेच्या ग्लासमध्ये एक चमचा चहा पावडर घ्यावी लागेल. या चहा पावडरमध्ये लिंबाचा रस मिक्स करा. लिंबू रस मिक्स केल्यावर चहापावडरचा रंग बदलतो. रंग पिवळा किंवा हिरवा झाला तर समजा तुमची चहा पावडर चांगली आहे. तसेच जर दुसरा रंग आला तर चहा पावडर भेसळयुक्त असल्याचं समजून जा.

टिश्यू पेपर टेस्ट

चहा पावडरमधील भेसळ ओळखण्यासाठी यामध्ये तुम्ही टिश्यू पेपर टेस्ट सुद्धा करू शकता. त्यासाठी एका टिश्यू पेपरवर एक चमचा चहापावडर घ्या. त्यानंतर यावर पाणी फवारा. तसेच नंतर यावरील चहापावडर काढून टाका. तसेच हा टिश्यू पेपर बाहेर उन्हात सुकवा. उन्हात सुकवल्याने त्यावर विविध रंगाचे डाग दिसल्यास चहा पावडरमध्ये भेसळ आहे.

कोल्ड वॉटर टेस्ट

कोल्ड वॉटर टेस्ट अगदी सोपी आहे. यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या. या पाण्यात २ चमचे चहा पावडर मिक्स करा. चहा पावडर हळू हळू रंग बदलेल आणि नंतर तिला अगदी गडद रंग येईल. हिच प्रोसेस जर चहा पावडर पाण्यात टाकल्या टाकल्या रंग अगदी गडद झाला तर यामध्ये भेसळ असल्याचे समजते.

Testing Tea Leaves Adulteration
Milk Adulteration: दुध भेसळखोरांविरोधात होणार कठोर कारवाई, राज्य सरकार करणार स्वतंत्र कायदा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com