Tata Punch: टाटा पंच होणार ऑक्टोबरमध्ये लॉन्च! दमदार बॅटरीसह मिळणार जबरदस्त रेंज

Tata Punch Electric Vehicle : टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार.
Tata Punch
Tata PunchSaam Tv

Tata Punch Price Battery Specification

वाहनांच्या उत्पादनात टाटा मोटर्सचे नाव खूप मोठे आहे. टाटाची नवीन नेक्सॉन इलेक्ट्रिक कारची फेसलिफ्ट येत्या आठवड्यात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कार उत्पादकांनी या वर्षी तीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचे वचन दिले होते. त्यातील पुढील कार 'टाटा पंच' इलेक्ट्रिक कार आहे. तर त्यानंतर टाटा मोटर्स ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या काळात सर्वात लहान SUV लॉन्च करणे अपेक्षित आहे.

टाटा मोटर्सची नेक्सॉन इलेक्ट्रिक कार, टिगोर इलेक्ट्रिक कार आणि टियागो इलेक्ट्रिक कारनंतर टाटा पंच चौथी इलेक्ट्रिक कार असेल. तर ICE, CNG आणि इलेक्ट्रिक व्हर्जन ऑफर देणारी तिसरी कार असेल.

Tata Punch
Mercedes-Benz CLA Concept: मर्सिडीजची CLA कार लवकरच बाजारात! सिंगल चार्जवर 750 KM जबरदस्त ड्रायव्हिंग रेंज

टाटा पंच अधिकृतपणे लॉन्च होण्याआधी अनेक वेळा रस्त्यांवर या कारची चाचणी करण्यात आली. स्पाय शॉर्ट्सने या कारच्या काही वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे. त्यामुळे टाटा पंच कारमध्ये पुढील वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा आहे.

टाटा पंचची रचना ही ICE आणि CNG व्हर्जन सारखीच असण्याची शक्यता आहे. टाटा पंच इलेक्ट्रिक कारला लोखंडी जाळी असणारे बंद युनिट असण्याची अपेक्षा आहे. टाटा मोटर्सने पहिल्यांदा इव्ही पंचवर त्यांच्या नवीन इव्ही ब्रँडची ओळख वापरणे अपेक्षित आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही ही नवीन बाह्य आणि अंतर्गत रंगासह येण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्स सहसा त्यांच्या इलेक्ट्रिक कारमध्ये ब्लू अॅक्सेंट वापरते. त्यामुळे मिश्र धातूंचे डिझाइनदेखील अपडेट केली जाण्याची शक्यता आहे.

Tata Punch
Kotak Mahindra Bank : कौटुंबिक व्यवसायात हात बसला नाही; लहान खोलीत सुरू केला नवा व्यवसाय; आज आहेत देशातील सर्वात मोठे बँकेचे मालक

स्पाय शॉट्सनुसार, टाटा पंच ही पहिली इलेक्ट्रिक कार असेल की ज्या कारचा चार्जिंग पोर्ट कारच्या पुढील बाजूस असेल. इतर टाटा इलेक्ट्रिक कारमध्ये मागील बाजूस चार्जिंग पॉईंट असतो.

टाटा मोटर्स 4 kWh युनिट किंवा 26 kWh बॅटरी पॅक वापरण्याची शक्यता आहे. ही बॅटरी Tiger EV मॉडेलमध्ये वापरते. Tiago मध्ये वापरलेली छोटी बॅटरी एका चार्जवर 250 किमी पर्यंतची रेंज देते. Tiger Evमध्ये 315 किमी पर्यंतची रेंज देते. तर टाटा पंचमध्ये मिळणारी बॅटरी बदलू शकते. जी सुमारे 300-km मार्क असावी. ही चार्जिंग जलद गतीने होईल अशी अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com