टाटाची आणखी एक 'झक्कास' इलेक्ट्रिक कार आली; फीचर्स जाणून घ्या

आपल्‍या न्‍यू फॉरेव्‍हर तत्त्वाशी बांधील राहत टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज नेक्‍सॉन ईव्‍ही प्राइमच्‍या लाँचची घोषणा केली.
NEXON EV PRIME
NEXON EV PRIMESaam Tv
Published On: 

मुंबई : आपल्‍या न्‍यू फॉरेव्‍हर तत्त्वाशी बांधील राहत टाटा मोटर्स (TATA) या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज नेक्‍सॉन ईव्‍ही प्राइमच्‍या लाँचची घोषणा केली. या वेईकलमध्‍ये उच्‍चस्‍तरीय, स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये आहेत- जसे मल्‍टी-मोड रिजेन, रिजेनवर ऑटोमॅटिक ब्रेक लॅम्‍प अॅक्टिव्‍हेशन, क्रूझ कंट्रोल, इनडायरेक्‍ट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (आयटीपीएमएस), स्‍मार्टस्विच इंटीग्रेटेड कनेक्‍टीव्‍हीटी वैशिष्‍ट्य आणि ११० सेकंदांचा चार्जिंग टाइमआऊट.

ईव्‍ही मालकीहक्‍क अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जात टाटा मोटर्स आपल्‍या अद्वितीय सॉफ्टवेअर अपडेटच्‍या माध्‍यमातून ही नवीन सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये २२,००० हून अधिक विद्यमान नेक्‍सॉन ईव्‍ही मालकांना देत आहे. या अपडेटचा विद्यमान मालकांना त्‍यांचा ड्राइव्‍ह अनुभव, कनेक्‍टीव्‍हीटी आणि कार्यक्षमता वाढवत 'इव्‍हॉल्व्हिंग टू इलेक्ट्रिक'च्‍या दिशेने प्रवासामध्‍ये लाभ होईल. ईव्‍हींच्‍या सुरूवातीच्‍या अॅम्‍बेसेडर्सनी केलेल्‍या प्रयत्‍नांची प्रशंसा करत टाटा मोटर्स त्‍यांच्‍या विद्यमान ग्राहकांना २५ जुलै २०२२ पासून कंपनीच्‍या ऑथोराइज्‍ड सर्विस सेंटर्समध्‍ये मोफतपणे पहिले सॉफ्टवेअर अपडेट देणार आहे. एकसंधी व्‍यवहारासाठी टाटा मोटर्स लवकरच ग्राहकांकरिता माहितीपूर्ण उपक्रम राबवणार आहे. त्‍यानंतर सर्व विद्यमान मालकांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स सशुल्‍क आधारावर असतील.

NEXON EV PRIME
Fashion tips : त्वचेच्या रंगानुसार कसा निवडाल साडीचा रंग ?

टाटा (TATA) पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे मार्केटिंग, सेल्‍स व सर्विस स्‍ट्रॅटेजीचे प्रमुख विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ''नेक्‍सॉन ईव्‍हीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे आणि लाँचपासून इलेक्ट्रिक वेईकल विभागामध्‍ये सातत्‍याने अग्रस्‍थानी राहिली आहे. ६५ टक्‍क्‍यांहून अधिक मार्केट शेअरसह ही ईव्‍ही इच्‍छुकांसाठी डिफॉल्‍ट निवड आहे. नेक्‍सॉन ईव्‍ही प्राइमसह आम्‍हाला आमचे उत्‍पादन ऑफरिंग न्‍यू फॉरेव्‍हरचे धोरण अधिक प्रबळ होण्‍याची अपेक्षा आहे. विद्यमान ग्राहकांसाठी या सॉफ्टवेअर अपडेटसह आम्‍ही ग्राहक टाटा ईव्‍ही मालकीहक्‍क अनुभवाचा भाग म्‍हणून करू शकणा-या अपेक्षांचा नवीन बेंचमार्क स्‍थापित करत आहोत.''

NEXON EV PRIME
लिपस्टिकच्या या शेड्स मॅच होतील चेहऱ्याच्या प्रत्येक रंगाला!

नेक्‍सॉन ईव्‍ही प्राइम अस्‍पायरेशल इलेक्ट्रिक एसयूव्‍ही आहे, जी शून्‍य उत्‍सर्जनांसह एकाच चार्जमध्‍ये विनासायास लांब अंतराची रेंज (३१२ किमीची एआरएआय प्रमाणित रेंज) देते. या इलेक्ट्रिक वेईकलमध्‍ये उच्‍च क्षमतेची ३०.२ केडब्‍ल्‍यूएच लिथियम-आयन बॅटरीची शक्‍ती असलेली शक्तिशाली व उच्‍च-कार्यक्षम १२९ पीएस परमनण्‍ट-मॅग्‍नेट एसी मोटर आहे. कारलाइनसोबत उद्योगातील सर्वोत्तम धूळरोधक व जलरोधक बॅटरी पॅक येते, जे आयपी६७ मानकांची पूर्तता करते. तसेच बॅटरी व मोटरवर ८ वर्षे किंवा १,६०,००० किमी (जे पहिले लागू असेल ते) वॉरंटी देखील येते. याव्‍यतिरिक्‍त कारमध्‍ये रिमोट कमांड्स, वेईकल ट्रॅकिंग ते ड्रायव्हिंग बीहेवियर अॅनालिटिक्‍स, नेव्हिगेशन व रिमोट डायग्‍नोस्टिक्‍स अशी ३५ मोबाइल अॅप-आधारित कनेक्‍टेड वैशिष्‍ट्ये आहेत. नेक्‍सॉन ईव्‍ही तीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे: सिग्‍नेचर टील ब्‍ल्‍यू, ग्‍लेशियर व्‍हाइट आणि नुकतेच सादर केलेला डेटोना ग्रे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.