Tata vs Hyundai
Tata vs Hyundai Saam Tv

Tata vs Hyundai : Tata Motors ने लॉन्च केली नवी कार; बाजारात कमालीची विक्री Hyundai ची, कारणं काय ?

कारचे क्रेझ आपल्यापैकी अनेकांना आहे परंतु, कार खरेदी करताना कोणतीही विकत घ्यावी हा प्रश्न सर्वांना पडतो.
Published on

Tata vs Hyundai : कारचे क्रेझ आपल्यापैकी अनेकांना आहे परंतु, कार खरेदी करताना कोणतीही विकत घ्यावी हा प्रश्न सर्वांना पडतो. मागच्या वर्षात अनेक नव्या कारने बाजारात प्रवेश केला त्यातच नेहमी आघाडीवर असणारे Tata Motors आणि Hyundai मागे कसे राहातील.

डिसेंबर मधील कार विक्री चे आकडे आपल्या समोर आलेले आहेत. मारुती सुझुकी कंपनीने डिसेंबर मध्ये अधिक कार विक्री केल्या तर टाटा मोटर्स या विदेशी कंपनीने कार विक्रीत भारतात दुसरा क्रमांक पटकवला होता पण आता समोर आलेल्या आकड्यानुसार Hyundai कंपनीने टाटा मोटर्स पेक्षा जास्त कार विक्री केल्याचे समोर आलेले आहे.

Tata vs Hyundai
Kia EV6 Car : Kia ने लॉन्च केले नवे मॉडेल, देतेय Tata आणि Hyundai ला जबरदस्त टक्कर !

कार चे Wholesale नंबर काय होते?

मारुती सुझुकीने 1,12,010 युनिट्स कार डिस्पॅच करून पाहिला क्रमांक पटकावला त्याच वेळी टाटा मोटर्सने 40,045 युनिट्स कार डिस्पॅच करून Hyundai कंपनीला मागे टाकून दुसरा क्रमांक मिळवला तर Hyundai ने 38,821 कार डिस्पॅच केल्या आणि तिसरा क्रमांक मिळवला.महिंद्रा आणि किया मोटर्स चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

Hyundai ने मारली अशी बाजी -

आता डिसेंबरमध्ये कार विक्रीच्या (डीलर्सकडून ग्राहकांना विकल्या गेलेल्या कार) आकडेवारीबद्दल बोलूया. कार विक्रीतही मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावर आहे, पण Hyundai ने बाजी मारली आहे आणि दुसरे स्थान मिळवले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (FADA) ही आकडेवारी जाहीर केली आहे.

Tata vs Hyundai
Hyundai Electric Car : 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणार Hyundai ची इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या, स्पेसिफिकेशन्स

यानुसार, गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने 1,16,662 युनिट्सची विक्री केली आहे, तर Hyundai ने 41,287 युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, डिस्पॅचच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली टाटा मोटर्स 36,826 युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. अशा स्थितीत Hyundai ने पुन्हा दुसरे स्थान पटकावले आहे.

कार विक्रीचे आकडे -

Maruti Suzuki - 1,16,662 यूनिट्स

Hyundai - 41,287 यूनिट्स

Tata Motors - 36,826 यूनिट्स

Mahindra - 26,777 यूनिट्स

Kia - 18,126 यूनिट्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com