Hyundai Electric Car : तरुणाईमध्ये गॅजेट्सचे प्रचंड प्रमाणाच क्रेझ आहे. हल्ली जगभरातील (World) बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे. हे लक्षात ऑटोमेकर ईव्हीच्या उत्पादनालाही गती देत आहे.
त्यासाठीच Hyundai ने अखेर आपले नवीन इलेक्ट्रिक वाहन Hyundai IONIQ 5 भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे Hyundai IONIQ 5 लॉन्च करण्यात आले.
1. एक लाख रुपयांत बुक करा
जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर तुम्ही फक्त 1 लाख रुपये भरून ती बुक करू शकता.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या इलेक्ट्रिक वाहनाची बुकिंग 21 डिंसेबर 2022 पासून सुरू होईल.
Hyundai IONIQ 5, E-GMP (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म) वर विकसित केलेले पहिले मॉडेल पंप-टू-प्लग क्रांती सुरू करण्यासाठी सज्ज आहे.
2. Hyundai IONIQ 5
याच्या सुविधेबद्दल बोलायचे झाले तर, Hyundai IONIQ 5 देखील 21 Hyundai Smart Sense वैशिष्ट्यांसह (लेव्हल 2 ADAS) सोयीस्कर आणि अत्याधुनिक ड्रायव्हिंग अनुभव देईल. या कारची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कार केवळ 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होईल.
3.स्पेसिफिकेशन्स
वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, ते Hyundai IONIQ 5 V2L (वाहन-टू-लोड) ने सुसज्ज आहे.
आत आणि बाहेर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जे 3.6 kW पर्यंत विद्युत उपकरणांना उर्जा देऊ शकते.
इतकेच नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने या कारच्या २०२१ च्या मॉडेलने युरोपमधील युरो एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये पंचतारांकित रेटिंग मिळवले होते.
कारमध्ये लेन कीप असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
4. फीचर्स
कारच्या (Car) आतील भागात 12.3-इंचाचा HD टचस्क्रीन मुख्य डिस्प्ले आणि आणखी 12.3-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आहे.
यासोबतच वायरलेस फोन चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, सनरूफ, प्रिमियम रिलॅक्सेशन सीट, रिलॅक्सेशन फंक्शनॅलिटी, इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट, लंबर सपोर्ट, स्लाइडिंग सेंटर कन्सोल आदी सुविधाही उपलब्ध आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.