आयूष्यात अनेक वेळा अशा परिस्थिती येतात, जेव्हा तुम्हाला पैशांची तातडीने गरज असते. अशा वेळी तुमच्या जवळ पैसे नसल्यास किंवा इतर कुठूनही मदत किंवा कर्ज मिळत नसल्यास तुम्ही काय करता? हीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोन घेण्यासाठी पात्रता
गोल्ड लोन घेण्यासाठी कोणतेही विशिष्ट नियम (Rules) किंवा कठोर पात्रतेची आवश्यकता नसते. हे सगळ्याच लोकांसाठी उपलबध्द बनण्याचे कारण आहे. अनेक प्रकरणांमध्ये, गोल्ड लोन देणाऱ्या संस्था कर्जदाराची वयोमर्यादा साधारणपणे 21 ते 59 वर्षांच्या दरम्यान ठेवतात.
आणखी एक खास गोष्ट म्हणजे गृहिणींसह कमी उत्पन्न असलेल्या लोकांनाही गोल्ड लोन सहज मिळू शकते. कमी क्रेडिट स्कोअर असतानाही गोल्ड लोन मिळवता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कमी कागदपत्रे आणि जलद प्रक्रिया
गोल्ड लोनची अप्रूव्हल दिलेल्या सोन्याच्या क्वॉलिटीचे आणि त्याच्या किंमतीचे मूल्यांकन करण्यावर अवलंबून असते. गोल्ड लोन देणाऱ्या वित्तीय संस्था सोनच्याची आवश्यक अशी चाचणी करतात.
याचा परिणाम असा होतो की कागदपत्रे कमी होतात आणि कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ होते आणि ती लगेच मंजूर होते. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या बातमीनुसार, गोल्ड लोन जलद प्रक्रियेसाठी ओळखले जाते. ऑनलाइन पडताळणीने या प्रक्रियेला आणखी गती दिली आहे, अर्जाच्या त्याच दिवशी कर्ज जमा करण्याची परवानगी दिली आहे.
अंतिम वापरावर कोणतेही निर्बंध नाहीत
गोल्ड लोनचा तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होतो. कारण कर्जाच्या रकमेच्या उपयोजनावर कोणतेही निर्बंध नाहीत. कर्जदाराला कोणत्याही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे वापरण्याचे स्वातंत्र्य आहे. कर्जदार त्याच्या कोणत्याही आपत्कालीन, वैद्यकीय खर्च, शिक्षण खर्च, कर्जाची परतफेड, व्यवसाय विस्तार, घर सुधारणा, प्रवास नियोजन किंवा लग्नाच्या खर्चासाठी निधी वापरू शकतो.
तुमचे सोने पूर्णपणे सुरक्षित राहते
गहाण म्हणून ठेवलेले सोने तुम्ही कर्ज घेतलेल्या पैशांची परतफेड करेपर्यंत गोल्ड लोन ऑफर करणाऱ्या वित्तीय संस्थेद्वारे सुरक्षितपणे ठेवले जातात. हे कर्जाच्या कालावधीत तुमच्या मौल्यवान मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करते.
तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित हातात आहेत हे जाणून तुम्हाला मनःशांती मिळू शकते. गोल्ड लोन तुम्हाला तुमच्या सोन्याच्या किंमतीच्या महत्त्वपूर्ण प्रमाणात कर्ज घेण्याची परवानगी देते. मग, बाजार दर जास्त असताना तुम्हाला जास्त रक्कम मिळू शकते. विशेषत: जेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते, हे तुम्हाला तुमच्या मालमत्तेची किंमत वाढविण्यास मदत करते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.