Brain Stroke Symptoms : आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, शरीरामध्ये चांगले आणि वाईट असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल उपलब्ध असतात. अशातच एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे शरीरामध्ये घाण साचू लागते. या कारणामुळे शरिरातील नसा बंद होण्याचे चान्सेस वाढतात.
सोबतच नसा बंद होण्याची समस्या देखील वाढू शकते. वाईट कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये एका जागेवर जमून प्लांक निर्माण करतो. कधी कधी या प्लांकचे तुकडे रक्तामधून वाहून मेंदूच्या नसांनपर्यंत पोहोचतात.
यामुळे मेंदूमधील वाढते कोलेस्ट्रॉल स्ट्रोकचे कारण बनते. स्ट्रोकच्या वाढन्याणे मेंदूच्या नसा बंद पडतात आणि कधी कधी एवढ्या प्रमाणात वाढते की, नस फाटण्याची भिती असते.
कोलेस्ट्रॉलला कंट्रोलमध्ये कसे ठेवावे -
वेळीच शरिरातील वाढते कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या प्रयत्न केला पाहिजे. शरिरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी आपण सर्वात आधी आपली डायट (Diet) मेंटेन ठेवली पाहिजे. याशिवाय कीचनमध्ये उपलब्ध असलेली एक गोष्ट तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करू शकते.
सामान्यरीत्या दालचीनी ही प्रत्येक घरामध्ये (Home) वापरली जाते. दालचिनीचा वापर अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. एका रिसर्चनुसार दालचीनीची पावडर एलडीएल कोलेस्ट्रॉल, टोटल कोलेस्ट्रॉल आणि ट्राइग्लीसराईडच्या स्तराला कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
दालचिनी पावडरचे फायदे -
दालचिनी पावडर शरीरामधील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून ब्रेन हेमरेज, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारखा अनेक आजारांना दूर करते. हृदयासंबंधीचे आजार बऱ्याचदा ट्राइग्लीसराइड आणि वाईट कोलेस्ट्रॉलमुळे उद्भवतात. याशिवाय दालचिनी बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यास मदत करते. सोबतच इम्यूनिटीला मजबूत करते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.