Kolhapur News: लाकूड-चामड्याच्या कमतरतेने चर्मवाद्य उद्योग संकटात

वाद्ये बनविण्यासाठी लागणारे लाकूड कमी प्रमाणात मिळते. यासाठी शिसम लाकूड वापरले जायचे. आता शिसमवर बंदी आहे. कच्चे शिसम, आंबा या लाकडाचा उपयोग वाद्य बनविण्यासाठी केला जातो.
Kolhapur News: लाकूड-चामड्याच्या कमतरतेने चर्मवाद्य उद्योग संकटात
Kolhapur News: लाकूड-चामड्याच्या कमतरतेने चर्मवाद्य उद्योग संकटात- Saam TV
Published On

कोल्हापूर : तबला, पखवाज, मृदंग ही वाद्ये बनविणे आता अवघड झाले. कारण यासाठी लागणारे लाकूड, कमावलेले चामडे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. वाद्ये बनविणारे कुशल कारागीरही कमी आहेत. या सर्व कारणांमुळे चर्मवाद्य आता काळाच्या पडद्याआड जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. (Tabla Making in trouble due to unavailability of wood and leather)

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात चर्मवाद्यांना एक वेगळे महत्त्व आहे. ही वाद्ये साथसंगत म्हणून वाजवली जातातच; पण या वाद्यांचे एकल वादनाचे कार्यक्रमही होतात. या वाद्यांची स्वतंत्र घराणीही आहेत. ख्यातनाम कलाकारही आहेत. तबला, पखवाज, मृदंग ही जगभर भारतीय संगीताची प्रतीके बनली आहेत.

Kolhapur News: लाकूड-चामड्याच्या कमतरतेने चर्मवाद्य उद्योग संकटात
राधानगरी’ च्या स्वयंचलित दरवाजांची पंचवार्षिक दुरुस्ती सुरु

मात्र, आता ही वाद्ये काळाच्या पडद्याआड जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे ही वाद्ये बनविण्यासाठी लागणारे लाकूड कमी प्रमाणात मिळते. यासाठी शिसम लाकूड वापरले जायचे. आता शिसमवर बंदी आहे. कच्चे शिसम, आंबा या लाकडाचा उपयोग वाद्य बनविण्यासाठी केला जातो. चामडेही कमावलेले आवश्यक असते. आता त्याची उपलब्धता मर्यादित आहे. ही वाद्ये बनविणारे कारागीरही कमी झाले. नवी पिढी याकडे वळत नाही. एकूणच आता चर्मवाद्ये बनविणे कठीण झाले आहे.

चर्मवाद्य बनविण्यासाठी लागणारे चामडे आणि लाकूड पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे तबला, पखवाज, मृदंग ही वाद्ये बनविणे अवघड होत चालले आहे. आता यातील कुशल कारागीरही कमी झाले. भविष्यात चर्मवाद्य दुर्मिळ होणार की काय, अशी भीती आता निर्माण झाली आहे.
- बाळासाहेब मिरजकर (चर्मवाद्य बनविणारे व्यावसायिक)

ऑनलाईन तबला
तबला, पखवाज, मृदंग ही वाद्ये आता ऑनलाईनही मिळू लागली आहेत. ज्यांना तबला शिकायचा आहे किंवा ज्यांना हौस म्हणून चर्मवाद्य घ्यायचे आहे. असे लोक ऑनलाईन खरेदी करतात. ऑनलाईन साईटवर तबल्याचा स्वर, प्रकार, लाकूड याचे विविध पर्याय उपलब्ध असतात. कसलेले वादक मात्र स्वतः जाऊन वाद्याची खरेदी करतात.

यंत्राद्वारे वाद्यनिर्मिती
मिरज येथे यंत्राद्वारे वाद्यनिर्मिती करण्याचा प्रयोग करण्यात येत आहे. सुरुवातीला विणा बनविण्याचा प्रयोग यशस्वी झाला. चर्मवाद्यही यंत्राद्वारे बनविता येतील का, याचा विचार सुरू असून, मिरज येथे औद्योगिक वसाहतीत यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com