शरीरात दिसणारी 'ही' 8 लक्षणे हार्मोन्समधील बिघाड दर्शवतात; जाणून घ्या

वयानुसार हार्मोनमध्ये बदल होत असतात.
शरीरात दिसणारी 'ही' 8 लक्षणे हार्मोन्समधील बिघाड दर्शवतात; जाणून घ्या
शरीरात दिसणारी 'ही' 8 लक्षणे हार्मोन्समधील बिघाड दर्शवतात; जाणून घ्याSaam Tv

Hormonal Imbalance: शरीरातील हार्मोन्सशी संबंधित समस्या किंवा काही बदल समजून घेणे शक्य नसते. पण शरीरात होत असलेल्या बदलांवर बारकाईने पहिले तर ते सहज ओळखता येते. तज्ञ डॉक्टर म्हणतात की, शरीरात दिसणारी काही लक्षणे हार्मोनल असंतुलनाबद्दल सांगतात.

हे देखील पहा-

हार्मोन्स हे रासायनिक संदेशवाहक असतात जे रक्ताद्वारे थेट शरीराच्या अवयवांमध्ये आणि ऊतींमध्ये विविध कार्यांसाठी पोहोचवले जातात. झोप, चयापचय, मनःस्थिती आणि पुनरुत्पादक चक्र नियंत्रित करण्यासाठी हार्मोन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वयानुसार हार्मोनमध्ये बदल होत असतात. काही औषधे, उपचार किंवा आरोग्य समस्या शरीरातील हार्मोन्सवर देखील परिणाम करू शकतात.

शरीरात दिसणारी 'ही' 8 लक्षणे हार्मोन्समधील बिघाड दर्शवतात; जाणून घ्या
पतीने पत्नीची फावड्याने केली हत्या; कारण ऐकून पोलिसही हैराण

हार्मोनमध्ये असंतुलन झाले असेल तर ही लक्षणे दिसून येतात;
मूड बदलणे, झोपण्याच्या पद्धतींमध्ये बदल (निद्रानाश), स्मरणशक्तीची समस्या, सतत थकल्यासारखे वाटणे, डोकेदुखी किंवा पचन समस्या यांचा समावेश होतो. याशिवाय स्नायूंशी संबंधित समस्या हे हार्मोन्समध्ये बिघाडाचे लक्षण असू शकतात.

मानसशास्त्रज्ञ टिम ग्रे म्हणतात की, हार्मोनशी संबंधित समस्यांमध्ये शरीरात जळजळ होण्याकडे दुर्लक्ष करणे ही एक मोठी चूक ठरू शकते. हे तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती कमी करते आणि शरीरातील कोर्टिसोल पातळी वाढवण्याचे काम करते. जास्त ताण घेणे, कमी झोप, प्रक्रिया केलेले किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने जळजळ होणे यासारख्या समस्या उदभवतात.

हार्मोनल असंतुलनामुळे होणारी जळजळ थांबवण्यासाठी नैसर्गिक आहार, पुरेशी झोप आणि खाणे आणि नियमित व्यायामाचे वेळापत्रक ठरवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चांगली आणि पूर्ण झोप घेणे महत्वाचे आहे. तणावमुक्त राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ध्यान करा. तसेच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com