Summer Vacation Trip
Summer Vacation TripSaam Tv

Summer Vacation Trip : उन्हाळ्यात फिरण्याचा प्लान करताय? अरुणाचल प्रदेशातील या थंडगार पर्यटनस्थळांना भेट द्या

Summer Vacation Travel : उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला थंड ठिकाणी फिरण्याची इच्छा होते. शाळा-कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आपण फिरण्याचे अनेक प्लान करतो. फिरण्याचा प्लान करत असाल तर अरुणाचल प्रदेशमधील या थंडगार पर्यटनस्थळांना भेट द्या.
Published on

Places To Visit In Arunachal Pradesh :

उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला थंड ठिकाणी फिरण्याची इच्छा होते. शाळा-कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आपण फिरण्याचे अनेक प्लान करतो. फिरण्याचा प्लान करत असाल तर अरुणाचल प्रदेशमधील या थंडगार पर्यटनस्थळांना भेट द्या.

अरुणाचल प्रदेश हे उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते. हे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. हिवाळ्यात या ठिकाणी तापमान दिवसा आणि रात्री उणे अंशापर्यंत खाली जाते. तर उन्हाळ्यात (Summer Season) येथील दृश्य अतिशय रोमांचक आणि सुंदर असते. तुम्हीही उन्हाळ्यात फिरण्याचा (Travel) विचार करत असाल तर अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) या पर्यटनस्थळांना भेट द्या

1. तवांग मठ

तवांग मठ हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ आहे. या मठाची स्थापना तवांग युद्ध स्मारक म्हणून करण्यात आली. ज्याची रचना ४० फूट इतकी आहे. हे तवांग नदीच्या खोऱ्यात वसलेले छो़टे शहर आहे.

Summer Vacation Trip
Mumbai-Pune Travel Plan : मुंबई-पुण्याजवळ फिरण्याचा प्लान करताय? IRCTC चे भन्नाट टूर पॅकेज पाहा

2. बाम ला पास

बाम ला पास हा भारतातील अरुणाचल प्रदेश आणि तिबेटच्या लाहोखा विभागामधील हिमालय पर्वताचा एक पर्वतीय खिंड आहे. तवांग शहरापासून ३७ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून १५,२०० फूट उंचीवर असून अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. हे ठिकाण त्रिकोणी टेकड्यांमध्ये वसलेले आहे.

3. सेला पास

सेला पास हा पश्चिम कागेंम जिल्हा आणि तवांग यांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. तिबेटी बौद्ध धर्मातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी १०१ पवित्र तलाव असून येथील दृश्य अतिशय सुंदर आहे.

Summer Vacation Trip
April Travel Destination : उन्हाळ्यात फिरा निसर्गरम्य पर्यटनस्थळी, या भन्नाट ठिकाणांना नक्की भेट द्या

4. नुरंग धबधबा

नुरंग धबधबा हा नुरनांग वॉटर फॉल आणि बोंग वॉटर फॉल असेही म्हणतात. हा आपल्या देशातील सर्वात सुंदर वॉटर फॉल्सपैकी एक आहे. येथील दृश्य डोळ्यांचे पारणं फेडतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com