Benefits Of Jamun : उन्हाळ्यात रक्तातील साखर राहिल नियंत्रणात, जांभळाचे करा सेवन

Summer Care Tips : उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. या काळात स्वत:ला हायड्रेट ठेवणे जास्ती गरजेचे आहे. उन्हाळ्यात आपल्याला सर्वत्र जांभूळ पाहायला मिळतात. याचे सेवन आपल्यापैकी अनेकजण करतात.
Benefits Of Jamun
Benefits Of JamunSaam Tv

How To Control Blood Sugar :

उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. या काळात स्वत:ला हायड्रेट ठेवणे जास्ती गरजेचे आहे. उन्हाळ्यात आपल्याला सर्वत्र जांभूळ पाहायला मिळतात. याचे सेवन आपल्यापैकी अनेकजण करतात.

या काळात आपल्याला ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. जांभूळमध्ये लोह, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन (Vitamins) सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. चवीला हे फळ आंबट आणि तुरट असते. जाणून घेऊया याच्या सेवनाचे फायदे (Benefits).

जांभूळ फळामध्ये पोषक जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. जांभूळ खाल्ल्याने त्वचेत कोलेजन तयार होण्यास मदत होते. मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी जांभूळ अतिशय फायदेशीर मानले जाते.

Benefits Of Jamun
Diabetes Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी हे ५ पदार्थ खायलाच हवे, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

1. साखरेची पातळी

जांभूळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहाण्यास मदत होते. यात असणारे ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता देखील टाळता येते.

2. डिहायड्रेशन

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका सर्वाधिक असतो. या दिवसात घाम जास्त येतो. याशिवाय हवामान गरम असते. शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. जी या फळाच्या सेवनाने पूर्ण होऊ शकते. उष्णतेमुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असला तरीही रॉक मिठासोबत याचे सेवन करु शकता.

3. हिमोग्लोबिन वाढते

शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी देखील जांभाळाचा फायदा होतो. यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे रक्त शुद्ध करण्यासाठी देखील ओळखले जाते. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

Benefits Of Jamun
World Hemophilia Day 2024 : हिमोफिलिया म्हणजे काय? हा आजार कसा होतो?

4. हृदय निरोगी ठेवते

जांभळाच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. यामुळे उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करण्यास मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह देखील सुधारतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com