Stress Benefits : थोडासा ताण हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे ! जाणून घ्या कसा?

तणाव आपल्या शरीरासाठी चांगला कसा आहे ? जाणून घ्या.
Stress Benefits
Stress BenefitsSaam Tv
Published On

Stress Benefits : सतत तणावात राहाणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. परंतु थोडासा ताण हा शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतो.

तणावाच्या या फायदेशीर पातळीच्या काही उदाहरणांमध्ये परीक्षेसाठी अभ्यास करणे, व्यावसायिक बैठकीची तयारी करणे किंवा मुदती पूर्ण करण्यासाठी काही अतिरिक्त वेळ घेणे समाविष्ट आहे.

अलीकडील संशोधन असे सूचित करते की तणाव मर्यादित कालावधीसाठी असल्यास आपल्यासाठी सकारात्मक कार्य करते. चला जाणून घेऊया तणावाचे काही फायदे (Benefits).

मानसशास्त्रज्ञ डॉ. बिंदा सिंग यांनी दोन प्रकारच्या तणावाविषयी स्पष्टीकरण दिले, एक म्हणजे युस्ट्रेस जो सकारात्मक ताण मानला जातो आणि दुसरा तणाव आरोग्यासाठी वाईट मानला जातो.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कमी कालावधीचा ताण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते आणि आपली मेंदूची क्रिया सुधारण्यास मदत करते. अल्पकालीन ताण हे आपल्यासाठी कसे फायदेशीर आहे याबद्दल जाणून घेऊया.

Stress Benefits
Stomach Problems : या पदार्थांचे सेवन केल्याने होतील पोटाच्या अनेक समस्या दूर, अपचन व वाढलेले वजनही होईल कमी

सकारात्मक तणावाचा फायदा कसा होतो जाणून घ्या

१. प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत -

तणाव आपल्याला संसर्गापासून वाचवण्यास मदत करु शकतो. थोडासा ताण शरीरात इंटरल्यूकिन तयार करतो जे रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते आणि अनेक रोगांपासून आपले संरक्षण करण्यास मदत करते.

२०१३ च्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या संशोधनानुसार, थोडा ताण घेतल्याने शरीरात कॉर्टिकोस्टेरॉन नावाचा तणाव संप्रेरक तयार होतो, ज्यामुळे मानसिक क्षमता वाढते आणि शिकणे सोपे होते.

२. डीएनए आणि आरएनएचे संरक्षण -

संशोधनात असे आढळले आहे की, मर्यादित प्रमाणात ताण शरीरातील अँटिऑक्सिडंट्स वाढवते ज्यामुळे डीएनए आणि आरएनएचे संरक्षण होते. पण जर ताण जास्त असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम पेशींवरही होतो.

२०१३ च्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी सॅन फ्रान्सिस्कोच्या अभ्यासात असे आढळून आले की, दीर्घकालीन तणाव आपल्या डीएनए आणि आरएनएच्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानास प्रोत्साहन देते. तसेच दैनंदिन जीवनात तणावाचे (Stress) मध्यम स्तर प्रत्यक्षात त्याचे संरक्षण करतात आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसोबतचे मानसिक संबंध अधिक दृढ करतात.

३. एकाग्रता वाढणे -

युस्ट्रेस हा काही वेळेसाठी चांगला असतो, जो आपल्या ‘न्यूरोट्रोफिन्स’ ला उत्तेजित करतो. ही मेंदूची रसायने आहेत, जी मेंदूची शक्ती वाढवतात. यामुळे आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते, ज्यामुळे सर्जनशीलता आणि उत्पादकता वाढते.

४. अधिक लवचिकता निर्माण होणे-

सायन्स ऑफ रेझिलिन्समधील अभ्यासानुसार, तणावपूर्ण परिस्थितींना तोंड देण्यास शिकल्याने कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत गोष्टी सुरळीत करण्याची क्षमता वाढते. तणावपूर्ण परिस्थितींमध्ये वारंवार शारीरिक आणि मानसिक नियंत्रणाची भावना विकसित करण्याची संधी मिळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com