Stomach Worms : सतत पोटदुखणे, पोट फुगण्याचा त्रास होतोय? दुर्लक्ष करु नका, असू शकतो गंभीर आजार

Stomach Pain : आरोग्याकडे लक्ष न दिल्यास कधी कधी लहान वाटत असणारा आजार देखील गंभीर स्वरुपात बदलू शकतो. यासाठी आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Stomach Worms
Stomach WormsSaam Tv
Published On

Symptoms Of Stomach Worms :

व्यस्त जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. अनेकवेळा आरोग्याची काळजी घेऊनही लोक आजारी पडतात. आरोग्याकडे लक्ष न दिल्यास कधी कधी लहान वाटत असणारा आजार देखील गंभीर स्वरुपात बदलू शकतो. यासाठी आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

सततचा जंकफूड, खराब जीवनशैली यामुळे पोटदुखीच्या (Stomach) समस्या वाढताना दिसून येत आहे. पोटात जंत होणे हे सामान्य वाटत असले तरी कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकते. परंतु, कधी कधी याचा परिणाम आरोग्यावर (Health) विपरीत होऊ शकतो. पोटातील जंतांची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्याही शरीरात ही ५ बदल दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा (Doctors) सल्ला घ्या.

झोपेतून उठल्यानंतर कधी कधी आपल्याला पोट जड आणि फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे दिवसाची सुरुवात विचित्र आणि अस्वस्थ होते. खरंच पोट असे जड होणे, टम्म फुगते त्यामुळे आरोग्याचा अनेक समस्या उद्भवतात.

Stomach Worms
Weight Loss Tips: Dieting करुन वैतागलात? पोटाची चरबी कमी होत नाहीये? या ४ पदार्थांना आहारातून लगेच करा बाय

1. पोटात जंत कशामुळे होतात?

जी व्यक्ती सतत मांसाहरी पदार्थ खातात त्यांच्या पोटात जंत होण्याची समस्या अधिक असते. याशिवाय ही समस्या रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांना त्रास देऊ शकते. त्याचवेळी जे लोक स्वच्छ पाणी पित नाहीत आणि अस्वास्थ्यकर अन्न खातात त्यांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो.

2. पोटात जंत झाले आहेत की, नाही कसे ओळखाल?

  • झोपताना दात घासण्याचा आवाज आला तर समजून घ्या पोटात जंत झाले आहेत.

  • याशिवाय ज्या लोकांची जीभ नेहमी पांढरी राहाते त्यांनाही हा त्रास होऊ शकतो.

  • जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पोटात किडे होतात तेव्हा त्यांच्या तोंडाला दुर्गंधी येते.

  • डोळे सतत लाल होणे चांगले नाही. याचा अर्थ असा की, पोटात जंत आहेत.

  • जर तुम्हाला वारंवार ताप येत असतील त्याकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com