Summer Digestive Drink : उन्हाळ्यात पोटात गडबड होते ? ट्राय करा 'हे' हेल्दी ड्रिंक्स, पाहा रेसिपी

Health Tips : उन्हाळ्यात आपण जे काही आहार घेतो ते पचवण्यासाठी आपल्या शरीराला जास्त मेहनत करावी लागते.
Summer Digestive Drink
Summer Digestive DrinkSaam Tv

Healthy Drink : उन्हाळा म्हटलं की, पोटाच्या संबंधी अनेक समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात अपचन, गॅस, डोकेदुखी अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. यावेळी बहुतेकांच्या पोटात उष्णता येते. याचे एक कारण म्हणजे उन्हाळ्यात आपण जे काही आहार घेतो ते पचवण्यासाठी आपल्या शरीराला जास्त मेहनत करावी लागते.

या ऋतूमध्ये (Season) तुम्ही विचार करूनच तुमचा आहार निवडावा. तसेच पोटाला थंडावा देणाऱ्या गोष्टींना आपल्या आहाराचा (Food) भाग बनवायला हवे. असेच एक उन्हाळी पेय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यात पोटाशी (Stomach) संबंधित समस्यांपासून सहज सुटका मिळवू शकता.

Summer Digestive Drink
Summer Recipe : या उन्हाळ्यात द्या पोटाला आराम, बनवा साउथ इंडियन स्टाइल Curd Rice रेसिपी

1. जाणून घ्या उन्हाळ्यातील या पाचक पेयाबद्दल

तज्ज्ञांनी सांगितलेले हे पेय उन्हाळ्यात आपल्या पचनाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे. हे पेय प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या काही वेळात नाहीशा होतात. जाणून घेऊया या रेसिपी

2. साहित्य

नारळ पाणी - 200 मि.ली

वेलची पावडर 1/4 टीस्पून

चिया सीड्स 1 टीस्पून (भिजवलेले)

गुलकंद १/२ टीस्पून

Summer Digestive Drink
Summer Healthy Recipe : उन्हाळ्यात पाचनशक्ती स्ट्रॉग बनवायची आहे ? मग नाश्त्यात ट्राय करा ओट्स इडली, पाहा रेसिपी

3. कृती

नारळाच्या पाण्यात वरील सर्व पदार्थ नीट मिसळा. चमच्याने ढवळत राहा. तुमचे उन्हाळी पाचक पेय तयार आहे.

याचा फायदा कसा होईल

1. नारळ पाण्याचे फायदे

नारळात मध्यम साखळी ट्रायग्लिसराइड्स (MCTs) असतात. हे आतड्यांसंबंधी जळजळ कमी करते आणि पचन सुधारते. हे प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. त्यात व्हिटॅमिन ई देखील चांगल्या प्रमाणात आढळते. हे प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. नारळाचे पाणी देखील आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

2. वेलची पावडरचे फायदे

वेलचीमध्ये फायबर खूप जास्त असते. त्यामुळे आपल्या पोटाला आराम मिळतो. गॅस आणि सूज दूर करण्यासाठी हे खूप चांगले आहे.

Summer Digestive Drink
Food Avoid In Summer For Kids : उन्हाळ्यात 'हे' पदार्थ मुलांना खाऊ घालू नका...अन्यथा होऊ शकते गंभीर समस्या

3. गुलकंदचे फायदे

गुलकंद आपल्या शरीरासाठी नैसर्गिक कूलर म्हणून काम करते. आम्लपित्त कमी करून आपली पचनक्रिया सुधारते. तसेच आतड्याची जळजळ कमी होते.

4. चिया सीड्सचे फायदे

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी चिया सीड्सचा वापर केला जातो . चिया सीड्स बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय आहेत. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि सकाळी पोट सहज साफ होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com