Share Market : बजेटपूर्वी शेअर बाजारात तेजी, सोनं-चांदी झाले स्वस्त...

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल
Share Market
Share MarketSaam Tv

Share Market : अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2023) सादर होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अर्थसंकल्पाकडून सर्वच स्तरातील जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, गुंतवणूकदारांच्या नजरा शेअर बाजारावर खिळल्या आहेत.

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल, हे काही वेळात स्पष्ट होईल. याशिवाय गुंतवणूकदारांच्या नजरा सोन्याच्या दरावरही असतील.

Share Market
Gold Silver Price Today : आठवड्याच्या सुरूवातीलाच सोने-चांदी दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

2022 मध्ये जेव्हा सामान्य अर्थसंकल्प सादर झाला, तेव्हा अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात प्रचंड वाढ झाली. या दिवशी शेअर बाजार नफ्याने सुरू झाला आणि नफ्याने बंद झाला. या दिवशी निफ्टीने 17,500 चा आकडा गाठला, तर सेन्सेक्सने 58,500 चा टप्पा ओलांडला. त्याच वेळी, 1 फेब्रुवारी 2022 रोजी सोन्याचा दरही वाढून 48,254 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

1. अर्थसंकल्पापूर्वी बाजार (Market) तेजीसह बंद झाले

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी (Budget) मंगळवारी बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले आणि व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हात बंद झाले. व्यवहाराअंती सेन्सेक्स 49.49 अंकांच्या म्हणजेच 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 59,549.90 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 33.35 अंकांच्या म्हणजेच 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 17,682.30 च्या पातळीवर बंद झाला.

2. अर्थसंकल्पापूर्वी सोने-चांदी स्वस्त झाले

अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी म्हणजे 31 जानेवारीला सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. मंगळवारी सोन्याचा (Gold) भाव 105 रुपयांनी घसरून 56,780 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भावही 379 रुपयांनी घसरून 68,418 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

3. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांचा कल कमी झाला

आर्थिक सर्वेक्षण 2023 नुसार, एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत म्युच्युअल फंडांमधील निव्वळ प्रवाहात वार्षिक 72 टक्के घट झाली आहे. FY 2023 च्या एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत, म्युच्युअल फंडांमध्ये केवळ 70,000 कोटी रुपयांची निव्वळ आवक झाली आहे. यापूर्वी, भारतीय (India) म्युच्युअल फंडांनी FY2022 च्या एप्रिल-नोव्हेंबर कालावधीत 2.5 लाख कोटी रुपयांचा निव्वळ प्रवाह पाहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com