संसर्गजन्य आजारांवर मसाल्याचे 'हे' पदार्थ आहेत गुणकारी

पावसाळ्यात हवा-पाण्यातून होणारे आजार टाळण्यासाठी काही मसाल्याचे पदार्थांचे (Spices) सेवन आपल्या शरीरासाठीदेखील फायदेशीर ठरते.
संसर्गजन्य आजारांवर मसाल्याचे 'हे' पदार्थ आहेत गुणकारी
संसर्गजन्य आजारांवर मसाल्याचे 'हे' पदार्थ आहेत गुणकारी saam tv
Published On

पावसाळा (Monsoon) आणि संसर्गजन्य आजार (Infectious diseases) हे समीकरण ठरलेलेच असते. पावसाळ्यात सर्दी, पडश्यासह मलेरिया, डेंग्यू, श्वसनमार्गातील इन्फेकशन, कॉलरा यांसारखे अनेक आजार उद्भवतात. खरंतर भारतात अनेक संसर्गजन्य आजार आहेत. या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसू लागली की आई पहिल्यांदा आपल्याला घरगुती औषधे देते. भारतीय महिलांच्या (Indian Womens) स्वयंपाकघरात (Kitchen) असे अनेक पदार्थ असतात, जे आपल्याला या संसर्गजन्य आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करतात. या औषधांमुळे आपण बरे होतो इतकेच नव्हे तर ही घरगुती औषधे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवतात.पावसाळ्यात हवा-पाण्यातून होणारे आजार टाळण्यासाठी काही मसाल्याचे पदार्थांचे (Spices) सेवन आपल्या शरीरासाठीदेखील फायदेशीर ठरते. (These spices are effective against infectious diseases)

हळद
हळदsaam tv

-हळद (Turmeric): भारतातील प्रमुख औषधी पिकांमध्ये हळद हे प्रमुख मसाला पीक आहे. हळदीत करक्यूमिन हा औषधी घटक असतो, या घटकाचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. आयुर्वेदातही हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. हळदीतील अँटीऑक्सिडेंट गुणधर्मामुळेविविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांपासून तुमचे संरक्षण होते. घशाला संसर्ग झाल्यास दुधात हळद घालून प्यायल्यास त्याचा फायदा होतो. हळदीचे पाणी पिण्यामुळे आपल्या डोके शांत होते. हळदीतील अँटिसेप्टीक गुणधर्मामुळे जखम लवकर भरते. हळद ही भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य आहे. अन्न, सौंदर्य प्रसाधने, पारंपरिक कर्मकांडे व विधी, औषधे, रंग अशा अनेक गोष्टींसाठी हळदीचा वापर केला जातो.

दालचिनी
दालचिनी saam tv

- दालचिनी (Cinnamon) : यात अँटी बॅक्टरील गुणधर्म असतात. तसंच दालचिनी ही नैसर्गिकरित्या उष्ण असते. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, खवखवणे हे त्रास दूर होण्यास मदत होते. घसा दुखणे, खवखवण्याचा त्रास, सर्दी यावर दालचिनी घातलेला गरम चहा घेणे हा परिणामकारक उपाय आहे. दालचिनीच्या सेवनाने मनाची अस्वस्थता होते. यकृताचे (Liver)कार्य सुधारते. विशेष म्हणजे दालचिनी स्मरणशक्ती (Memory) वाढवते. थंडीमुळे डोकेदुखी होत असल्यास दालचिनी पाण्यात वाटून त्याचा लेप लावल्यास आराम मिळतो. दालचिनीच्या सेवनाने मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात.

saam tv

लवंग
लवंगsaam tv

लवंग (Clove): झाडाच्या फुलांच्या कळ्या म्हणजे लवंग असतात. सर्दी, खोकला, नाक चोंदणे यांसारख्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी लवंग अत्यंत गुणकारी आहे. लवंग मॅंगनीजचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. रोजच्या जेवणात लवंगचा वापर केल्यास हाडे मजबूत होतात आणि मेंदूची स्मरणशक्तीही वाढते. लवंगात युजेनॉल नावाचे रसायन असते, जे नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. विशेष म्हणजे, संशोधनानुसार लवंगाच्या अर्कामुळे ट्यूमरची वाढ थांबते आणि लवंगातील औषधी रसायनांमुळे कर्करोगापासून बचाव होऊ शकतो.

लसूण
लसूण saam tv

लसूण (Garlic): लसूणामध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी- बॅक्टेरिअल, अँटी - फंगल आणि अँटी - व्हायरल हे गुणधर्म आढळतात. लसणामुळे खोकला आणि फुफ्फुसात अडकलेला कफ दूर होण्यास मदत होईल. लसणाच्या सेवनाने शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन कमी होण्यास मदत मिळेते. लसणाच्या तेलातील अँटी ओबेसिटी घटक वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचं रसायन आढळते. यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो. लसणाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारकशक्ता वाढते.

आलं (Ginger): आलं हा मसाल्यामधील महत्वाचा घटक आहे. आल्यात अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. घसा खवखवत असेल किंवा खोकला झाला असेल तर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यायल्यास आराम मिळतो. आल्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह व झिंक यांसह क, ब३ व ब६ ही जीवनसत्वांनी परिपुर्ण आहेत. आलं वातनाशक आहे. जेवणानंतर पोटात गॅस झाल्यास आल्याचे चाटण घ्यावे. त्यामुळे आतड्याची हालचाल वाढून पोटातील वेदना कमी होतात.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com