Som Yag Yadnya 2023 : गोव्यात 5 फेब्रुवारीपासून सोमयाग यज्ञ

गोमंतभूमीतील पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धनासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाने सोमयाग यज्ञ उत्सवाचे आयोजन केले आहे.
Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023 Saam Tv
Published On

पणजी : गोमंतभूमीतील पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धनासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाने सोमयाग यज्ञ उत्सवाचे आयोजन केले आहे. म्हापसा येथे ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत सकाळ, गोमन्तक आणि गोमन्तक टाइम्सतर्फे ‘सोम याग यज्ञ महोत्सव २०२३’ होईल.

या सहा दिवसांतील अनुभव प्रसन्न करणारा, स्वत:शी एकरूप करणारा आणि आध्यात्मिक स्वरूपाचा असेल. शांतता प्रस्थापित करणे तसेच गोव्यातील (Goa) पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा ‘सोमयाग यज्ञ महोत्सवा’चा उद्देश आहे. अग्निहोत्री सुहोता दीपक आपटे हे ऋत्विज असतील. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यातील काही निवडक मंत्रांचे पठण यावेळी केले जाईल.

सोमयाग यज्ञाचे म्‍हापसा येथे होणारेआयोजन स्‍वागतार्ह आहे. आयोजक सकाळ-गोमन्‍तक माध्‍यम समूहाचे कौतुक आहे. पर्यावरणीय (Environmental) दृष्टिकोनातून सोमयागाला मोठे महत्त्‍व असून, या कार्यासाठी आमचे पूर्ण सहकार्य लाभेल.

- ब्रह्मेशानंदाचार्य स्‍वामी

Som Yag Yadnya 2023
Yoga for white hair : पांढऱ्या केसांना पुन्हा काळे करायचे आहे ? 'ही' योगासने नियमित करा

महोत्सव कुठे?

श्री विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान, म्हापसा-कळंगुट रोड, श्री देव बोडगेश्वर मंदिराजवळ, काणका-म्हापसा.

महोत्सव कधी?

5 ते 10 फेब्रुवारी 2023. वेळ सकाळी 6.30 ते रात्री 9 वाजेपर्यंत.

महोत्सवात नेमके काय?

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यातील काही निवडक मंत्रांचे पठण यावेळी केले जाईल. आपल्यातील ऊर्जेला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी पवित्र अग्नीही प्रज्वलित केला जाईल.

सोमयाग यज्ञ आणि त्याचे वैज्ञानिक फायदे -

सोमयाग यज्ञामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊ शकते, असे डॉ. प्रणय अभंग सांगतात. या यज्ञामुळे हवेतील सूक्ष्मजीवांचा भार 90 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. तसेच आजूबाजूच्या वातावरणातील अनेक विषाणू नष्ट होऊ शकतात किंवा निष्क्रिय होऊ शकतात.

याशिवाय SOx चे प्रमाण सुरवातीच्या पातळीपेक्षा 10 पटींपर्यंत कमी होते. या यज्ञाचे अनेक दीर्घकालीन परिणाम आहेत. प्रणय अभंग यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘यज्ञ आणि वैज्ञानिक अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला होता.

अभंग यांच्या प्रबंधानुसार NOx पातळी निश्चित केलेल्या मानकं किंवा थ्रेशोल्स पातळी ओलांडत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

Som Yag Yadnya 2023
Yoga For Beginners : हिवाळ्यात नवशिक्यांसाठी खास योगासने, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबत इतर अनेक फायदे!

ऋत्विज कोण? 1963 मध्‍ये आपटे यांनी स्‍वीकारले त्रेताग्नी अग्निहोत्र व्रत -

1. अग्निहोत्री सुहोता दीपक आपटे हे गोव्यातील अग्निहोत्र व्रत स्वीकारणारी, आपटे कुटुंबातील तिसरी पिढी. त्यांचे वडील सोमयाजी दीपक आपटे व आजोबा सोमयाजी महादेव (सखा) आपटे हे त्रेताग्नी उपासक होते.

2. अक्कलकोट निवासी परमसद्‌गुरु श्री गजानन महाराज यांच्या आज्ञेने 1963 मध्ये आजोबा श्रीसखा दीक्षित आपटे यांनी प्रथम अखंड त्रेताग्नी अग्निहोत्र व्रत स्वीकारले. त्यांनी हे व्रत अखंड 48 वर्षे श्रद्धेने केले.

3. सुहोता आपटे यांनी पाच वर्षे गोव्यातील शांकर पाठशाळेत वैदिक शिक्षण घेतले. त्यानंतर घरी आजोबांकडे कृष्ण यजुर्वेद शाखा अध्ययन केले व श्रौत (अग्निहोत्रादिक) अध्ययन आजोबांकडेच केले. 2018 मध्ये अग्निहोत्र व्रत स्वीकारले व अक्कलकोट येथे सोमयाग करून सोमयाजी झाले.

4. सोमयाजी सुहोता दीपक आपटे व सुहोता समृद्धी दीक्षित आपटे हे उभय दाम्पत्य या अग्निष्टोम सोमयागाचे यजमानपद भूषविणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com