Skin care Tips: पिंपल्सविरहीत त्वचेसाठी कढीपत्त्याचे फेसपॅक आहे गुणकारी

कढीपत्त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात जे त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात
Skin care Tips: पिंपल्सविरहीत त्वचेसाठी कढीपत्त्याचे फेसपॅक आहे गुणकारी
Skin care Tips: पिंपल्सविरहीत त्वचेसाठी कढीपत्त्याचे फेसपॅक आहे गुणकारी Saam tv
Published On

आपण कढीपत्ता (Curry leaf) खाण्यापिण्यात वापरतो. त्याचा सुगंध अन्नातील चव वाढवण्याचे काम करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, कढीपत्त्याच्या वापराने त्वचेवरील मुरुम, पुरळ आणि डागांपासून मुक्तता मिळण्यासही मदत होते. अनेकदा प्रदुषण, स्ट्रेस, आजारपण यांमुळे चेहरा खराब होतो. कोरड्या आणि तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples) आणि डागांची समस्या सुरु होते. अशा पिंपल्स आणि डागांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा वापर करू शकता. हे तुमच्या कोरड्या त्वचेला मॉइस्चराइज करते तसेच अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. (Skin care Tips: Curry leaf face pack is good for pimple free skin)

कढीपत्त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात जे त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. तुम्ही फेस पॅक म्हणून वापरू शकता. हे त्वचेला मॉइस्चराइज करते तसेच सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करते. कढीपत्त्याचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया

Skin care Tips: पिंपल्सविरहीत त्वचेसाठी कढीपत्त्याचे फेसपॅक आहे गुणकारी
International Cat Day | 'खरे मांजरप्रेमी' असाल तर हे नक्की वाचा

कढीपत्ता आणि मुलतानी मिट्टी

कढीपत्ता बारीक वाटून घ्या आणि मुलतानी मिट्टीमध्ये घाला. या मिश्रणात एक चमचा गुलाब पाणी घाला आणि फेस पॅक चेहऱ्यावर 20 मिनिटे ठेवा. हे त्वचेचा पोत सुधारते.

कढीपत्ता आणि लिंबू फेस पॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी 20 ते 25 कढीपत्ता नीट धुवून बारीक करा. त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटे सोडा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जखम असेल तर ही पेस्ट लावणे टाळा. कारण त्यात लिंबू आहे, जे लावल्यानंतर जळू लागते.

कढीपत्ता आणि हळदीचा फेस पॅक

जर तुमच्याकडे तेलकट त्वचा असेल तर हा फेस पॅक तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फेस पॅकमध्ये हळदीचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे डाग आणि मुरुम दूर होण्यास मदत होते. हा फेस पॅक लावण्यासाठी कढीपत्ता आणि हळद एकत्र करून चांगले मिक्स करावे. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने धुवा.

कढीपत्ता आणि दही

हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा दही आणि एक चमचा मध मिक्स करून लावा. यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल काढून त्वचेला चमक येते. त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्याबरोबरच दही त्वचेच्या समस्या दूर करते.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com