सोशल मिडीयावर आपण विविध प्रकारचे मीम्स बघत असतो, त्याचा आनंद घेत असतो. यात सर्वात गंमतीशीर मीम्स असतात ते मांजरांचे. मांजरांचे नखरे, त्यांची मस्ती, त्यांचे आवाज आणि त्यांचं मालकाशी असणारं बॉन्डींग हे भारीच असतं. मांजरीच्या या खोडकर वृत्तीमुळे अनेकदा आपल्या घरातील वस्तूंचं नुकसान होतं, पण त्यांच्या ओव्हरलोडेड क्युटनेसमुळे आपला राग तात्काळ शांतही होतो. तर आज याच मांजरींचा दिवस, म्हणजेच जागतिक मांजर दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घ्यायलाच हव्यात. (International Cat Day - If you are a true cat lover, then definitely read this)
हे देखील पहा -
आंतरराष्ट्रीय मांजर दिवस (International Cat Day) दरवर्षी ८ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. २००२ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मांजर दिवस साजरा करण्यात आला होता. पशु कल्याणसाठी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय निधाद्वारे मांजरीच्या संरक्षणाची चर्चा केली गेली होती. त्यावेळेस स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय कल्याण निधीने ८ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय मांजर दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. मांजरीचे संरक्षण करणे आणि मदत करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.
मांजर हा एक सस्तन प्राणी आहे. स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील फेलिडी (मार्जार) कुलात मांजराचा समावेश केला जातो. सिंह, वाघ व चित्ता हे मार्जार कुलातील वन्य प्राणी आहेत. जगात जवळपास सगळीकडेच मांजर हा प्राणी आढळतो. सर्वसाधारणपणे एका वर्षात वाढ पुर्ण होते. नर (बोका) १० महिन्यांनी तर मांजरी ७ ते १२ महिन्यानंतर प्रजननक्षम होते. मांजर एका वेळी ४ ते ५ पिलांना जन्म देऊ शकते. पिले ४ ते ६ आठवडे दूध पितात आणि याच काळात तिचे अनुकरण करून बऱ्याच गोष्टी शिकतात. दोन महिन्यांनी पिले स्वतंत्रपणे वावरू लागतात. पिलांना चार आठवड्यांपर्यंत मांजरीच्या दुधाव्यतिरिक्त इतर खाद्य देण्याची गरज नसते.
कुत्र्यानंतर सर्वात जास्त पाळला जाणारा प्राणी हा मांजरच आहे. त्यामुळे मांजर माणसाळले आहेत. पर्शियन, मॅक्स, हिमालयन, जपानी बॉबटेल, ॲबिसिनियन, सयामी, बिर्मन, मेन कून या मांजरांच्या काही प्रसिद्ध आहेत. अनेक बॉलिवुड आणि मराठी फिल्म इंडस्ट्री मधील अनेक सेलिब्रीटींकडे मांजरी आहेत. अनेकदा ते त्याच्यासोबतचे फोटोजही शेअर करताना दिसतात.
दिशा पाटनी मांजरांच्या अक्षरशः प्रेमात आहे. जॅकलीन फर्नांडिसकडेही एक गोड मांजर आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेकडे पर्शियन कॅट असून मुक्ताने त्याचं नाव झेंडू असं ठेवलंय. जुई गडकरीकडेही चार मांजरं आहेत. याशिवाय नेटकरीही मांजरींवर खूप प्रेम करतात. मांजरप्रेमी या पेजवर तुम्हाला मांजरींचे भन्नाट फोटोस् व्हिडीओज आणि मीम्स मिळतील. grumpy cat या मांजरावर सर्वात जास्त मीम्स बनले आहेत. तर आजच्या या आंतरराष्ट्रीय मांजर दिनी तुम्हीही आपल्या मांजरीला किंवा बोक्याला नक्की पार्टी द्या, Happy International Cat Day!
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.