Baiju Bawra
Baiju BawraTwitter

Baiju Bawra: चित्रपटातून दीपिका पदुकोणची हाकालपट्टी तर रणवीरची 'एन्ट्री'

संजय लीला भन्साळीचा (Sanjay Leela Bhansali) बैजू बावरा (Baiju Bawra) हा चित्रपट आजकाल चर्चेत भाग आहे. या चित्रपटातील कलाकारांबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत.

संजय लीला भन्साळीचा (Sanjay Leela Bhansali) बैजू बावरा (Baiju Bawra) हा चित्रपट आजकाल चर्चेत भाग आहे. या चित्रपटातील कलाकारांबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. आधी हा चित्रपट रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ऑफर करण्यात आला होता, त्यानंतर कार्तिक आर्यनचे (Kartik Aaryan) नाव पुढे आले आणि आता रणवीर सिंगने (Ranveer Singh) सर्वांना मागे टाकत विजय मिळवला आहे. परंतू आता दीपीका पटूकोन या चित्रपटातून बाहेर पडली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे कारण ते त्यांच्या आवडत्या जोडप्याला पुन्हा एकत्र पाहू शकणार नाहीत. दोघे पाचव्यांदा एकत्र काम करणार होते. पण आता हे होणार नाही.

Baiju Bawra
Sunny Leone सेटवर आली बंदूक घेऊन; Video व्हायरल

दीपिका पदुकोण चित्रपटातून बाहेर

बॉलिवूडचे वृत्त देणाऱ्या माध्यमांच्या अहवालानुसार, दीपिकाला तिचा पती रणवीर सिंग एकढेच पैसे हवे होते. त्यापेक्षा एकही पैसा जास्त नाही किंवा कमी नाही. दीपिकाला इंडस्ट्रीतील इतर आघाडीच्या कलाकारांप्रमाणेच चित्रपटांमध्ये फी मिळत आहे, परंतु बैजू बावरामध्ये हे होणार नाही. दीपिकाची विनंती नाकारण्यात आली असून तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

भन्साळी निर्मितीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर आणि दीपिका संजय लीला भन्साळींच्या चित्रपटामध्ये दिसणार नाही. सीतेची भूमिका साकारण्यासाठी करीना कपूरने 12 कोटी मागितल्यानंतर दीपिकाच्या फी वाढीची चर्चा झाली होती. करीना कपूर रामायण चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे.

बैजू बावरा बद्दल बोलताना, या चित्रपटाबद्दलचे अहवाल मे 2021 मध्ये आले. अहवालांवर विश्वास ठेवला तर आलिया भट्ट, अजय देवगन आणि दीपिका पदुकोण या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पण आता फि वाढिच्या मुद्यावरुन दीपिकाला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह संजय लीला भन्साळीच्या ‘गोलियों की रासलीला - रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत’ या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. याशिवाय रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लवकरच कपिल देव यांच्या बायोपिक 83 मध्ये एकत्र दिसणार आहेत. दीपीका कपिल देवची पत्नी रोमी देवच्या भूमिकेत दिसणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com