Simulation Lab in India : कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्सने भारतात सुरू केली ग्राउंडब्रेकिंग सिम्युलेशन लॅब

Mumbai : हाय फिडेलिटी सिम्युलेशन लॅबच्या उद्घाटनाची घोषणा पहिल्यांदा मुंबईत करताना अभिमान वाटत आहे.
Simulation Lab in India
Simulation Lab in IndiaSaam Tv
Published On

मुंबई :

कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ मुंबई ही एक शतकाहून अधिक काळाचा समृद्ध इतिहास असलेली एक प्रतिष्ठित संस्था आहे तिच्या अत्याधुनिक, हाय फिडेलिटी सिम्युलेशन लॅबच्या उद्घाटनाची घोषणा पहिल्यांदा मुंबईत करताना अभिमान वाटत आहे.

१९१२ मध्ये सर्जन जनरल सर एच. डब्ल्यू. स्टीव्हन्सन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली स्थापन झालेले, मुंबईचे फिजिशियन आणि सर्जन कॉलेज, ज्याला सामान्यत: "CPS मुंबई" म्हणून ओळखले जाते, हे गेल्या १११ वर्षांपासून भारतात वैद्यकीय शिक्षणात आघाडीवर आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपल्या गौरवशाली इतिहासासह आणि वैद्यकीय उत्कृष्टतेसाठी अतूट समर्पण करणारी CPS मुंबई ही एक प्रतिष्ठित संस्था बनली आहे, जी विविध प्रकारच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची ऑफर देते आणि देशभरातील (World) इच्छुक आरोग्यसेवा (Health) व्यावसायिकांना आकर्षित करते.

Simulation Lab in India
Personal Loan Increase : RBI चा मोठा निर्णय! पर्सनल लोन घेणं झालं कठीण, मोजावे लागणार अधिक पैसे

सिम्युलेशन लॅब CPS मुंबईच्या अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षणाच्या वचनबद्धतेचा पुरावा असुन आधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधनांनी सुसज्ज आहे. हे सिम्युलेशन मॅनिकिन अर्थात एरेस (पुरुष प्रौढ मॅनिकिन), लुसीना (महिला प्रौढ मॅनिकिन), आणि आर्य (बालरोगविषयक मॅनिकिन) च्या समावेशाद्वारे विविध वैद्यकीय शाखांमधील प्रशिक्षणासाठी केंद्र म्हणून काम करते. या सिम्युलेशन मॅनिकिन्सवर विद्यार्थ्यांना आणि वैद्यकीय व्यावसायिकांना विविध वैद्यकीय परिस्थितींवर प्रशिक्षण (Education) दिले जाऊ शकते.

हे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण वैद्यकीय व्यावसायिकांची कौशल्ये आणि सक्षमता वाढविण्यासाठी तयार केले गेले आहे, ज्यामुळे ते उच्च-गुणवत्तेची रुग्ण सेवा देण्यासाठी अधिक चांगले तयार होतील.

Simulation Lab in India
Home loan Insurance : गृहकर्जासोबत इन्शुरन्स घेणे का गरजेचे? याचा फायदा कसा होतो? जाणून घ्या

हा महत्त्वाचा टप्पा आरोग्यसेवा अभ्यासक तसेच वैद्यकीय प्रशिक्षण आणि शिक्षण घेणाऱ्यांना चालना देण्यासाठी आणि ​​​​कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी संस्थेची वचनबद्धता अधोरेखित करतो.

सिम्युलेशन लॅबच्या वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची हॉस्पिटलसारखी सुविधा. यामध्ये काचेच्या रूममधून विद्यार्थी किंवा वैद्यकीय व्यवसायी यांची सतत देखरेख केली जाऊ शकते. या रूममधे विद्यार्थी स्वतः प्रशिक्षण घेतात तर शिक्षक काचेच्या आडून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. हे प्रशिक्षण एक अद्वितीय आणि वास्तववादी अनुभव देते. हा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन शिकण्याची, क्लिनिकल सरावाची तसेच अधिक व्यावहारिक आणि सर्वसमावेशक समज वाढवतो.

Simulation Lab in India
Tata Trusts : टाटा ट्रस्ट्सची सहयोगी संघटना CInI ला मिळाला प्रतिष्ठित 2023 अॅश्डेन पुरस्कार

सिम्युलेशन लॅबमध्ये एकुण तीन रूम आहेत ज्या मॅनिकिनने सुसज्ज आहेत. सर्व रूम एका मॉनिटरिंग रूमला तसेच डीब्रीफिंग रूमला जोडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांसमोर मांडलेल्या केस परिस्थितीची चर्चा डीब्रीफिंग रूममध्ये केली जाते, जिथे इतर विद्यार्थी त्यांच्या समवयस्कांना मॅनिकिनसोबत काम करताना पाहू शकतात. याव्यतिरिक्त, प्रत्येक मॅनिकिन, सिम्युलेशन लॅबमध्ये स्क्रीनवर प्रदर्शित केलेल्या सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जाते.

CPS ने सिम्युलेशन-आधारित सेमिनार, प्रशिक्षण कार्यक्रम आणि परीक्षा आयोजित करण्यासाठी फॅकल्टी प्रशिक्षण आधीच सुरू केले आहे. १९, २० आणि २३ ऑक्टोबर २०२३ रोजी प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण सत्रही पार पडले. अत्याधुनिक संसाधने आणि प्रशिक्षण संधी प्रदान करून, ही संस्था वैद्यकीय क्षेत्रातील विकसित होत असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शेवटी भारतातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी पुढील पिढीला तयार करत आहे

सिम्युलेशन लॅबचा शुभारंभ हे भारतातील वैद्यकीय शिक्षणात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, तसेच हेल्थकेअर इनोव्हेशनमध्ये आघाडीवर राहण्यासाठी CPS मुंबईचे समर्पण प्रतिबिंबित करते.

सिम्युलेशन लॅबचे व्यावहारिक, वास्तविक व जागतिक प्रशिक्षण, तसेच तंत्रज्ञान आणि संसाधनांवर लक्ष केंद्रित करणे, हे CPS मुंबईच्या वैद्यकीय शिक्षणातील उत्कृष्टतेच्या दीर्घकालीन परंपरेला बळकटी देते. CPS मुंबई आणि सिम्युलेशन लॅबबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया https://www.cpsmumbai.org/ ला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com