Side Effects Of Eating Spinach : पालक पनीर, आलू पालक असे अनेक पालकचे पदार्थ आहेत ज्यांची अगदी नावं ऐकली तरीही तोंडाला पाणी सुटतं.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये सर्वात फायदेशीर मानली जाणारी पालक भाजी ही अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते. त्यामुळे आहारात पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.
पालक भाजी, सलाद, ज्यूस, सूप अशा अनेक लज्जतदार डिश आपण बनवत असतो. पालकमध्ये अँटिऑक्सिडंट्स याशिवाय सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांसारखी अनेक खनिजे आढळतात. त्यामुळे लहान मुले आणि गर्भवती महिलांनाही याचा फायदा होतो.
पालक खाणे हे शरीरासाठी नक्कीच चांगले आहे, पण पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीरात समस्या उद्भवू शकतात. रक्त पातळ होणे, किडनी स्टोनचा त्रास होणे आणि सांधेदुखीचा त्रास होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. पालकमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यास (Health) हानीकारक आहे.
जाणून घेऊया पालक खाल्ल्याने काणते हानीकारक परिणाम होतात -
१. किडनी स्टोनचा (मुतखडा) त्रास -
पालक जास्त खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो. लघवीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण वाढल्याने किडनीमध्ये खडे तयार होऊ लागतात. पाण्यात उकळल्यास त्यातील ऑक्सलेटचे प्रमाण कमी होते. तसेच पालक, दही किंवा पनीर एकत्र करून खाल्ल्यास किडनी स्टोनचा धोका कमी होऊ शकतो.
२. रक्त पातळ होणे -
पालकमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व (Vitamins) के असते ज्यामुळे रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात. जीवनसत्त्व के युक्त पालकमुळे रक्त पातळ करणाऱ्यांचे काम कमी होतो. स्ट्रोकचा धोका लक्षात घेऊन रक्त पातळ करणारे औषध दिले जाते.
३. संपूर्ण खनिजे मिळत नाहीत -
पालकमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे कॅल्शियम सारख्या आवश्यक खनिजांचे शोषण कमी करू शकते. पालकमध्ये कॅल्शियम आणि ऑक्सलेट दोन्ही आढळतात. त्यामुळे पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅल्शियमचे शोषण कमी होऊ शकते.
४. सांधेदुखीचा त्रास वाढणे -
पालकमध्ये प्युरीन नावाचे रासायनिक संयुग असते, जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही संधीवाताच्या समस्येने त्रस्त असाल तर त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मात्र, काही वेळा औषधांसोबत हिरव्या पालेभाज्या खाणे सुरक्षित मानले जात नाही. याच्या अतिसेवनाने उच्च रक्तदाब, रक्तातील साखर कमी होणे असे प्रकार होऊ शकतात. जर तुम्ही रक्तातील साखरेची किंवा रक्तदाबाची औषधे घेत असाल तर पालकचे जास्त सेवन करू नका.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.