
उन्हाळा सुरू झाला की, प्रत्येकालाच थंडगार पेय पिण्याची इच्छा होते. शरीराला थंडावा मिळावा यासाठी सॉफ्ट ड्रिंक किंवा उसाचा रस पिण्यावर जास्त भर असतो. उसाच्या रसाचे आरोग्याला जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. उसाच्या रसात कायबोहाइड्रेट, प्रोटिन, पोटॅशिअम, मिनरल्ससारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. या सर्व गोष्टी शरीराला पोषक तत्व देतात. परंतु, आपण उसाचा अधिक प्रमाणात रस प्यायलो तर शरीराला त्याचे नुकसानही होते.
तज्ञांच्या मते उसाचा रस दिवसातून एक ते दोन ग्लासापेक्षा जास्त प्रमाणात पिऊ नये. उसाच्या रसाच्या एका ग्लासात २५० कॅलरी आणि १०० ग्रॅम शुगर असते. यामुळे वजनही वाढते. त्याचप्रमाणे उसामध्ये हीट मोठ्या प्रमाणात असल्याने आपल्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो आणि आरोग्याच्या इतर समस्यांना सामोरं जावं लागतं. उसाचा रस अति प्रमाणात प्यायल्याने नेमकं काय होऊ शकतं, जाणून घेऊया.
१. मधुमेह
उसाच्या रसाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो, पण त्याचा ग्लायसेमिक लोड (GL) जास्त असतो. याचा अर्थ असा की, उसाचा रस पिल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी तो हानिकारक ठरू शकतो. उसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याचे अतिसेवन केल्यास हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि नसांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
२. दातांच्या समस्या
ज्या लोकांना दाताच्या समस्या आहेत, त्यांनी उसाचा रस पिणं टाळावं. उसाच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते तोंडातील बॅक्टेरियांचे प्रमाण वाढवू शकते. यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे दात किडणे, दातदुखी आणि हिरड्यांचे आजार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दातांच्या आरोग्यासाठी साखरयुक्त पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.
३. लठ्ठपणा
उसाच्या रसात कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. याच कारणामुळे वजन झपाट्याने वाढते. शरीराला प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज मिळाल्यानं रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे गोडाचे प्रमाण कमी करायला हवं. आपण जर दिवसात ५ ते ६ ग्लास उसाचा रस प्यायलो तर शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. पोट खराब होऊन उलटी, मळमळ किंवा चक्कर येण्याचा धोका वाढू शकतो.
४. त्वचेचे विकार
उसाच्या रसात नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. शरीरात साखरेचे जास्त प्रमाण वाढल्यास glycation नावाची प्रक्रिया होते, ज्यामुळे त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन कमकुवत होतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि झीज लवकर दिसते. कोलेजन हे त्वचेला ताठरपणा आणि लवचिकता देणारे प्रोटीन आहे. जास्त साखर सेवन केल्याने कोलेजनची गुणवत्ता कमी होते आणि त्वचा सैल पडते. साखर शरीरातील इन्फ्लेमेशन (दाह) वाढवते, ज्यामुळे मुरूम, पुरळ आणि त्वचेवरील इतर समस्या होऊ शकतात. साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो, त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.