Shopping Tips: स्वस्तात खरेदी करायची तर आठवड्याच्या 'या' दिवशी करा Shopping

Online Shopping Tips: आजकाल प्रत्येकजण ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देतो. विविध प्रकारांसोबतच येथे प्रचंड सवलतीदेखील ऑनलाईनमध्ये उपलब्ध असतात. आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगशी संबंधित काही टिप्स सांगणार आहोत.
Shopping Tips: स्वस्तात खरेदी करायची तर आठवड्याच्या 'या' दिवशी करा Shopping
Online Shopping TipsGoogle
Published On

तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टींवर प्रभाव टाकलाय. काही गोष्टी खरेदी करायची असली तरी आपण त्याची माहिती ऑनलाईन तपासत असतो. सध्या लोक दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी घरी बसून फोनद्वारे खरेदी करणे पसंत करतात. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण अनेक जीवनावश्यक वस्तू ऑनलाईन स्टोअर्सवरून खरेदी करतात.

ना बाजारात जाण्याचे टेन्शन ना दुकानदाराशी सौदा करण्याचं टेन्शन. ऑनलाइन शॉपिंगचा आणखी एक फायदा म्हणजे वेळोवेळी चांगल्या ऑफर्स मिळत असतात. बऱ्याच वेळा तुम्हाला ब्रँडेड वस्तू ह्या अगदी नगण्य अशा दरात मिळतात. पण या ऑफर्सची एक वेळ असते. ऑनलाईन शॉपिंगसाठी कोणती वेळ चांगली आहे, किंवा कोणती वेळ शॉपिंगसाठी चांगली नसते, हे जाणून घेऊ. ऑनलाइन खरेदीसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे आठवड्याची सुरुवात. म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी ऑनलाइन खरेदीत मोठी बचत करण्याची सर्वोत्तम वेळ.

ऑनलाईन खरेदी करताना साइटवर ट्रॉफिक थोडी कमी असते. त्यामुळे ऑफर आणि सूट मिळण्याची शक्यता वाढत असते. आठवड्याच्या सुरुवातीला लोकांवर ऑफिसच्या कामाचा ताण जास्त असतो, त्यामुळे त्यांना ऑनलाईन शॉपिंग करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये ऑनलाईन दुकानांवरची वर्दळ खूपच कमी असते.

वीकेंडच्या दिवशी म्हणजेच शनिवार आणि रविवारी ऑनलाईनवर सर्वात जास्त ट्रॉफिक असतं. यामुळे या दिवशी ऑनलाईन शॉपिंग करणं टाळलं पाहिजे. यादिवशी ग्राहकांची संख्या जास्त असल्याने किमतीवर सूट अनेकवेळा मिळत नाही. तर कधी कधी एखाद्या वस्तूसाठी अधिक किमत मोजावी लागते. वीकेंडमध्ये वस्तूंचा साठा संपण्याची शक्यताही असते. त्यामुळे वीकेंडला ऑनलाइन शॉपिंग करणे टाळावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com