
Shoes Fashion : थंडीचे दिवस सुरू झाल्यावर सगळ्यांच्या डोक्यात वूलेनची कपडे आणि शूज येतात. पण बऱ्याचदा काही मुली आपल्या कमी ऊंचीमुळे कपडे आणि शूज घालताना गोंधळून जातात. आज आम्ही तुम्हाला शूजच्या असे प्रकार दाखवणार आहोत. जे तुम्हाला नक्कीच आवडतील. कमी उंचीच्या मुली देखील शूज घालून फार छान दिसू शकतात.
बुट घातल्याने सगळेच अगदी स्टायलिश दिसू लागतात. त्याचबरोबर तुम्ही जे आऊटफिट घातलं असेल त्याच्यावर तुम्ही बुट वेअर केले तर तुमचे अटायर सुद्धा स्टायलिश दिसेल. अशातच आज आम्ही कमी उंची असलेल्या मुलींसाठी काही खास असे बुट सांगणार आहोत. जेणेकरून या बुटांना घातल्यावर त्या लांब दिसतील आणि छान दिसतील.
1. नी हाईट शूज : नी हाईट शूज घालण्यासाठी आणि घालून फिरण्यामध्ये खूप मेहेनत लागते. परंतु हे शूज घातल्याने एक वेगळाच लूक क्रिएट होतो. जो अत्यंत स्टायलिश दिसतो. हे शूज मिनी स्कर्टवर आणि जीन्सवरती (Jeans) सुद्धा खूप छान वाटतात. तुम्हाला हे बुट ड्रेसवर घालायचे असतील तर तुम्ही शूजला मिळते जुळते स्टॉकिंग्स घालायला विसरू नका.
2. ओवर द नी बुट : ओवर द नी बुट हे कमी उंचीच्या मुलींसाठी खूप चांगले आहेत. जर एखाद्या मुलीचे पाय छोटे असतील. ती उंचीने लहान असेल तर तिने हे शुज वापरावे. हे शूज घालून कमी ऊंचीच्या मुली (Women) लांब दिसतील. त्याचबरोबर हा एक क्लासी लूक तयार होईल.
3. पॉइंटेड बुट : तुम्हाला लांब सडक आणि सुंदर (Beautiful) दिसायचे असेल तर तुम्ही पॉइंटेड शूज वापरायला पाहिजे. या शूजची हील कमी किंवा जास्त असली तरीसुद्धा कमी उंचीच्या मुलींना छान दिसतात.
4. एंकल बुट : एंकल बुट कोणत्याही ड्रेसवरती छान दिसतात. त्याचबरोबर हे शूज एकदम कंफर्टेबल असतात आणि आपल्या पायांना आराम देतात. जर तुम्ही तुमच्या बॉटमच्या कलर सोबत मॅचिंग करून शूज घालाल तर तुमच्यावर शूज आकर्षक दिसतील.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.