Shani Pradosh Vrat: शनी आणि शिवाचा आशीर्वाद मिळवण्याठी ठेवा शनी प्रदोष व्रत; पुजेची विधी, मुहूर्त नोट करून घ्या

Shani Pradosh Vrat 2025: शनि प्रदोष व्रत केवळ भगवान शिवाचे आशीर्वाद देत नाही तर शनिदेवाच्या नाराजीपासून मुक्तता देखील मिळवून देते. दर महिन्याला येणाऱ्या या खास दिवसाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
Shani Pradosh Vrat
Shani Pradosh Vrat saam tv
Published On

आपलं आयु्ष्य सुखी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु कधी ना कधी आपल्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आणि समस्या दूर करायच्या आहेत तर शनी प्रदोष व्रत सर्वांसाठी खास असणार आहे.

कधी आहे शनी प्रदोष व्रत (Shani Pradosh Vrat Kab 2025)

जेष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी २४ मे २०२५ म्हणजेच आज संध्याकाळी ७.२० सुरु होणार आहे. ही तिथी २५ मे दुपारी ३.५१ पर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी प्रदोष व्रत शनिवारी असल्याने त्याला शनी प्रदोष व्रत म्हटलं जातं. या दिवशी शनीची पुजा करणं शुभ मानलं जातं. आजच्या दिवसी पुजेचा शुभ मुहूर्त ७.२० ते ९.१३ वाजेपर्यंत असणार आहे.

Shani Pradosh Vrat
Budhwar che Upay: घरी येणार पैसा अन् आनंद; बुधवारच्या दिवशी गणपतीची पूजा करताना 'हे' उपाय करा

शनीच्या प्रदोष व्रताचं महत्त्व

हा व्रत ठेवल्याने शिव आणि शनी या दोघांचाही आशीर्वाद संबंधित व्यक्तीला प्राप्त होतो. यामुळे तुमच्या आयुष्यात असलेल्या तक्रारी, कोर्टाच्या समस्या, आरोग्याच्या समस्या तसंच आर्थिक तंगी दूर होऊ शकते. असं मानलं जातं की, या दिवसाचा व्रत ठेवल्याने पूर्वीच्या जन्माचे पाप देखील धुतले जातात.

प्रदोष व्रत पूजेची विधी (Vrat Puja Vidhi)

  • सकाळी अंघोळ केल्यानंतर व्रताचा संकल्प करा

  • शिवलिंगाची स्थापना करून त्यावर जल अर्पण करा

  • त्यावर बेलपत्र, फळ, फूळ आणि धोत्र्याचं फूल अर्पण करावं

  • भगवान शिव यांच्या कुटुंबाची सामूहिक आरती करा.

  • प्रदोष व्रत कथा ऐका

Shani Pradosh Vrat
Guruwar che Upay : नोकरी, पैसे, आरोग्य सगळ्या समस्या होतील दूर; गुरुवारच्या दिवशी 'या' गोष्टी करा दान

शनी देवाला प्रसन्न करण्याचे उपाय

  • काळे तीळ आणि मोहरीचं तेल दान करावं

  • लोखंडाच्या वस्तू, उडीद डाळ, काळे कपडे आणि भोजन दान करणं शुभ मानलं जातं

  • शनीदेवाच्या फोटोवर मोहरीचं तेल चढवून ‘ॐ शनैश्चराय नमः’ मंत्राचा जप करावा.

  • हा व्रत केवळ आध्यात्मिक दृष्टीने नाही तर मानसिक आणि सामाजिक जीवनासाठी लाभदायक असतो.

  • यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येते.

Shani Pradosh Vrat
Laung che Upay: आर्थिक तंगीने त्रासताल? शुक्रवारी लवंगचे ४ अचूक उपाय करा, चुंबकासारखा पैसा येईल घरी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com