Shani Dev : दैनंदिन जीवनात चुकूनही 'या' चूका करू नका; अन्यथा शनिदेवाचा कोप होईल

Shani Dev Angry Reason : शनीचा कोप झाल्यावर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील वाईट काळ सुरू होतो. काही केल्या हा वाईट काळ आपली साथ सोडत नाही. आपण केलेल्या चुकांची पूर्ण शिक्षा भोगल्यानंतरच शनी
Shani Dev
Shani DevSaam TV

प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात ज्या पद्धतीने वागतो त्याच पद्धतीने त्याला त्याच्या कर्माची फळे मिळतात. अनेकांच्या आयुष्यात अचानक भरपूर नैराश्य येतं. ठरलेली कामं पूर्ण होताहोता अर्धवट राहतात. नात्यांमध्ये वाद समज-गैरसमज वाढतात. त्यावेळी अनेकांच्या राशीला शनी लागलेला असतो.

Shani Dev
#shorts : शनी देवस्थानातील कर्मचारी जाणार संपावर, २५ डिसेंबर बेमुदत संपाची हाक!

शनीचा कोप झाल्यावर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील वाईट काळ सुरू होतो. काही केल्या हा वाईट काळ आपली साथ सोडत नाही. आपण केलेल्या चुकांची पूर्ण शिक्षा भोगल्यानंतरच शनी आपली पाठ सोडतो. यमध्ये मानसीक ताण वाढतो. आपली प्रत्येक गोष्ट अयशस्वी ठरत असल्याचं वाटतं. त्यामुळे अनेक व्यक्ती शनीवारी शनी देवाची मनोभावे पुजा करतात.

शनी मागे का लगतो?

गरिबांना त्रास देणे

आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काही ना काही कामासाठी झटत असतो. स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात आपल्या आजुबाजूला काही व्यक्ती आपल्यापेक्षाही समृद्ध आणि पुढे असतात. तर काही व्यक्ती आपल्यापेक्षा बऱ्याच मागे असतात. म्हणजे काही श्रिमंत तर काही जण गरीब असतात. त्यामुळे आपण कधीही आपल्यापेक्षा गरीब असलेल्या व्यक्तीला हिनवू नये. त्यांना त्रास देऊ नये. असे केल्याने शनिदेवाचा कोप होतो.

काळा श्वान

आपल्या आजुबाजून अनेक श्वान असतात. सर्वच श्वानांची काळजी घेणे त्यांना विनाकारण हानी पोहचणार याची दक्षता घेणे हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. त्यात काळ्या श्वानाचा थेट शनिदेवाशी संबंध असल्याचं म्हटलं जातं. अनेक व्यक्ती अशा श्वानांना विनाकारण त्रास देतात. त्यांचा छळ करतात, त्यामुळे अशी क्रूर मानसीकता असलेल्या व्यक्तींवर शनिदेवाचा कोप होतो.

वृद्ध नागरिक

जर तुम्ही तुमच्या घरातील वृद्ध नागरिकांचा आदर करत नसाल तर तुमच्यावर शनिदेव कोपतो. त्यामुळे घरातील आई बाबा त्यांच्यासह सासू सासरे यांची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा मुलं आपलं तारतम्य सोडून वागतात आणि वृद्धांना त्रास देतात, त्यामुळे अशा व्यक्तींवर देखील शनी कोपतो.

अन्न पाणी वाया घालवणे

अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात भरपूर धनसंपत्ती कमवतात. मात्र नंतर त्यांना याचा गर्व होतो. त्यामुळे ते विनाकारण जास्त पाणी आणि अन्न वाया घालवतात. अन्न आणि पाणी वाया जाणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी. या चूका टाळल्यास शनिदेव तुमच्यावर कोपणार नाही.

टीप: शनिदेवाबाबत ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Shani Dev
Nagpur : "राज्यातील शनी दूर करण्यासाठी चालिसा पठण", रवी राणा | SAAM TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com