Sextortion: Sextortion चं जाळं कुणीतरी टाकतंय... त्यापासून कसं वाचाल?
Sextortion : हल्लीच्या तरुण पिढी सतत आपल्या सोशल मिडीयावर सक्रीय असते. त्यामुळे ते त्याच्या जाळ्यात इतके अडकले जातात की, ते काय करताय हे देखील त्यांना कळत नाही.
तंत्रज्ञानामुळे जग आणखी जवळ आले आहे हव्या त्या वेळेस हव्या त्या व्यक्तीशी बोलू शकतो परंतु, याचे जितके चांगले परिणाम आहेत तितकेच वाईट देखील. नुकत्याच एका बातमीने तरुणांच्या मनात धुमाकूळ घातला आहे ती म्हणजे सेक्सटॉर्शन. (Latest Marathi News)
सेक्सटॉर्शन म्हणजे काय ? तरुण पिढी ह्याला कशी बळी पडते हे जाणून घेऊया
सेक्सटॉर्शन म्हणजे ऑनलाइन (Online) ब्लॅकमेलींग. पण ही ब्लॅकमेलींग सेक्स संबंधीत असते. पण ते कसं हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल ना ? जाणून घेऊया त्याच्याबद्दल सविस्तर. समोरची व्यक्ती आपल्या व्हिडीओ कॉल (Call) करते व आपल्याला ऑनलाइन सेक्स करण्यासाठी सांगते. आपण होकार दिल्यानंतर ती त्याचा फोटो किंवा व्हिडीओ काढते. तसेच दुसरी बाजू अशी की, आपण त्यागोष्टीला नकार दिल्यास समोरची व्यक्ती हालचाली सुरु करतो आणि त्याचेही व्हिडीओ क्लिप आणि फोटो काढतो. ही अश्लील फोटो किंवा व्हिडिओ तयार करुन ते आपल्याला पाठविले जातात. या माध्यमातून आपल्याला ब्लॅकमेलिंग केले जाते. यालाच सेक्सटॉर्शन म्हणतात.
यानंतर ते आपल्याला सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देतात किंवा इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते व आपण या सर्व गोष्टींना घाबरुन त्यांना बळी पडतो. याच्या माध्यमातून ते आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.
सध्या या प्रकरणाला तरुण पिढी दिवसेंदिवस बळी पडत आहे. यातून स्वत:ला वाचवण्यासाठी आपण काय करायला हवे व कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.
याची मोडस ऑपरेंडी कशी असते ?
फेसबुक किंवा इंस्टावरुन ओळख वाढवण्याचा प्रयत्न.
समोरची व्यक्ती तरुणी आहे असं भासवलं जातं.
डीपीमध्ये आकर्षक फोटो ठेवले जातात.
रोमँटिक मेसेज पाठवून जाळ्यात ओढतात.
काही दिवसांनी 'तुझे न्यूड फोटो पाठवं' असं सांगतात.
काही तासांनी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात होते.
पैसे पाठवा नाहीतर फोटो व्हायरल करु असं सांगतात
यापासून स्वत:ला कसे वाचवाल ?
अनोळखी व्यक्तींच्या 'फ्रेंड रिक्वेस्ट' स्वीकारु नका
अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तींना स्वत:च्या खासगी गोष्टी सांगू नका.
स्वत:चे आक्षेपार्ह व्हिडीओ- फोटो कुणालाही पाठवू नका.
शक्य झालं तर फोनमध्ये स्वत: चे तसले व्हिडीओ ठेवूच नका. कारण फोन हरवला तर सेक्सटॉर्शन होऊ शकतं.
सरसकट सर्व अॅप्सना फोटो व व्हिडीओची परवानगी देऊ नका.
अनोळखी लिंकवरुन कोणतेही अॅप डाऊनलोड करु नका.
या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यास नक्कीच या रॅकेट पासून स्वत: ला वाचवू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.