Liver Health : रात्री झोप लागत नसल्याने होऊ शकतो गंभीर आजार, लक्षणे कोणती?

Health Tips : आपल्या निरोगी आयुष्याच्या दृष्टिकाणातून आपले लिव्हर देखील निरोगी असणे गरजेचे असते.
Liver Health
Liver HealthSaam Tv
Published On: 

Liver Health Tips : लिव्हर आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या निरोगी आयुष्याच्या दृष्टिकाणातून आपले लिव्हर देखील निरोगी असणे गरजेचे असते आणि जर का असे नसेल तर पोटासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. पचनक्रिया बिघडणे हे कमकुवत लिव्हरचे सर्वात मोठे लक्षण असू शकते.

नॉन अॅल्कोहोलिक आणि अॅल्कोहोलिक फॅटी लिव्हरमागच्या दोन गंभीर समस्या आहेत ज्या लिव्हर निरोगी नसण्याची लक्षणे (Symptoms) दर्शवतात. नॉन अॅल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या वेळी आपल्या पेशी विषयुक्त पदार्थ बनवू लागतात आणि लिव्हर योग्यरित्या कार्य करता येत नाही. तुमचे लिव्हर निरोगी (Healthy) आहे का ? कशी ओळखावी लिव्हर बिघडल्याची लक्षणे? आणि यापासून वाचण्यासाठीचे उपाय, जाणुन घेऊयात.

Liver Health
Fatty Liver Symptoms On Skin : चेहरा आणि त्वचेवर दिसतायत फॅटी लिव्हरची लक्षणं? जाणून घ्या...

अॅल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या रुग्णांमध्ये मद्याचे अतिसेवन करणाऱ्यांचा सामावेश होतो. त्यांना 'एआरएलडी' असे म्हटले जाते. एनसीबीआईच्या अहवालानुसार, लिव्हरच्या खराब होण्यामागे पोटासंबंधित समस्या कारणीभूत असू शकतात. त्याच बरोबर झोपेवर देखील परिणाम होतो.

रात्री (Night) झोप न लागणे, अचानक जाग येणे ही लिव्हर खराब होण्यामागची लक्षणे ठरु शकतात. अनेक लोकांना तणाव झोप न लागण्यामागचे कारण वाटते, पण याचा संबंध फॅटी लिव्हरशी देखील असू शकतो.

तज्ज्ञ म्हणातात जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा लिव्हर आणि किडनी वेगाने डिटॉक्सिफाय करण्याची प्रक्रीया करत असतात. पण जर लिव्हर खराब असेल तर शरीर अतिरीक्त ऊर्जा घेण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे मन अस्वस्थ होते व झोपमोड होते.

Liver Health
Liver Disease : दारुचे अतिसेवन ठरु शकते लिव्हरसाठी घातक, 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध !

निद्रानाशापासून कसे वाचावे -

1.जर तुम्हाला रात्री झोप न लागण्याची समस्या भेडसावत असेल तर लवकरात लवकर आपल्या लिव्हरची तपासणी करून घ्या.

2. तपाणसी बरोबरच आरोग्य सुधारु शकतील अशा पध्दतींचा अवलंब करावा.

3. लिव्हर बिघडवणाऱ्या गोष्टींचे सेवन करणे टाळावे.

4. चांगल्या झोपेसाठी रोज योगसाधना करावी.

तसेच लिव्हर सुधारण्यासाठी उपलब्ध असलेली योगासने आवर्जून करावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.