Second Hand Vehicles: जुनी कार खरेदी करण्याचा प्लान आहे? या तीन गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

Second Hand Vehicles Buying Tips : काही लोकांना कार किंवा दुचाकी खरेदी गरजेचं असतं. त्याचबरोबर अनेक जण जुनी कार खरेदी करण्याचा देखील प्लान करत असतात. अशा व्यक्तींनी काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचे आहे.
Second hand car
Second hand carSaam tv
Published On

Second Hand Vehicles Buying Tips in marahi:

बहुतेक जणांचं स्वत:ची गाडी आणि घर घ्यायचं स्वप्न असतं. व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी व्यक्ती स्वत:चं घर घेण्यासाठी धडपड करत असतो. त्यानंतर एखादी गाडी घेण्याचाही विचार करतो. काही लोकांना कार किंवा दुचाकी खरेदी गरजेचं असतं. त्याचबरोबर अनेक जण जुनी कार खरेदी करण्याचा देखील प्लान करत असतात. अशा व्यक्तींनी काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. (Latest Marathi News)

अनेक जणांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे नवी कोरी कार खरेदी करण्यास शक्य होत नाही. त्यांना नवी कार किंवा दुचाकी खरेदी करणेही शक्य होत नाही. अनेक जण बजेट कमी असल्याने जुनी कार खरेदी करण्याचा विचार करतात. तुम्ही गरजेनुसार आणि बजेटचा विचार करून जुनी गाडी विकत घेऊ शकता. मात्र, काही जुनी कार खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Second hand car
Cars Under 10 Lakh: 10 लाखांपेक्षा कमी किमतीत येतात या जबरदस्त हॅचबॅक कार, पाहा संपूर्ण लिस्ट

जुनी कार खरेदी करताना काय काळजी घ्याल?

1. कागदपत्रे तपासणे

जुनी कार खरेदी करताना कागदपत्रे तपासणे गरजेचे असते. जुनी कार किंवा दुचाकी व्यवस्थित असेल तर त्याचे कागदपत्रे पूर्ण आहे का, पाहणे गरजेचे आहे. या कागदपत्रात विमा, आरसी आणि पीओसीची कागदपत्रे आहे का, तपासणे गरजेचे आहे. यातील कोणतंही कागदपत्रे नसतील तर गाडी खरेदी करू नये.

2. इंजिनची तपासणी करणे

जुनी कार खरेदी करताना इंजिनची तपासणी करणे गरजेचे असते. तुम्ही मॅकेनिकला बोलावून इंजिन बरोबर आहे का, हे तपासून घेऊ शकता. या व्यतिरिक्त इंजिन ऑईल देखील तपासून घेणे गरजेचे आहे. इंजिन ऑईल नसेल गाडी खराब असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकारचे वाहन खरेदी करणे टाळावे.

Second hand car
Affordable Electric Car: बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करताय? हे पर्याय पाहाच!

3. चलन तपासून घेणे

जुनी दुचाकी किंवा कार खरेदी करण्याआधी वाहनाची कंडीशन तपासणे गरजेचे असते. त्यानंतर गाडीचे कागदपत्रेही तपासणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गाडीचे ई-चलन देखील तपासून घेणे गरजेचे आहे. कोणतीही जुनी गाडी खरेदी करण्यापूर्वी ई-चलन क्लिअर असणे गरजेचे आहे. जुन्या गाडीचं ई-चलन क्लिअर नसेल तर सर्व ई-चलन तुम्हाला भरावे लागेल. त्यामुळे ई-चलन तपासून घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com