Shravan Somwar And Nagpanchami 2023 : आज श्रावणी सोमवारी नागपंचमी.. 24 वर्षांनंतर आलाय हा दुग्धशर्करा योग

Shravan Somwar : श्रावण महिन्याला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जात असून तो शंकराला समर्पित आहे.
Shravan Somwar And Nagpanchami 2023
Shravan Somwar And Nagpanchami 2023Saam Tv

Nagpanchami : आज, 21 ऑगस्ट रोजी, श्रावण महिन्याच्या पहिल्याच उपवास केला जातो. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जात असून तो शंकराला समर्पित आहे. तेव्हा महादेव या सृष्टीचे चक्र चालवतात, असं म्हटलं जातं.

असे मानले जाते की जे लोक श्रावण सोमवारी उपवास करतात, भगवान शिव त्यांना सुख, आरोग्य, संपत्ती आणि इच्छित इच्छा (Disre) पूर्ण करतात. या वर्षी नागपंचमीही याच दिवशी साजरी केली जाते. अशा स्थितीत या दिवशी पूजा केल्याने शिवजींसोबतच नागदेवतेचा आशीर्वादही प्राप्त होईल.

Shravan Somwar And Nagpanchami 2023
Nag Panchami 2023 : नागपंचमीला बनवा हे खास 3 गोड पदार्थ, पाहा सोप्या रेसिपी

या वर्षी श्रावण महिना खूप खास आहे. या वर्षी श्रावण महिना अधिक असल्याने अनेक महत्त्वाचे उपवास आणि सणही श्रावणमध्येच होतील. अधिक मास असल्याने ऑगस्ट महिन्यात नागपंचमीचा सण साजरा होतोय. विशेष म्हणजे नागपंचमीचा सणही श्रावण सोमवारच्या दिवशी साजरा केला जातोय.

पंचांगानुसार नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरी (Celebrate) केली जाते. नागपंचमीला नागांची पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी वासुकी नागाची विशेष पूजा केली जाते. भोलेनाथ वासुकी नाग आपल्या गळ्यात गुंडाळतो. म्हणूनच शिवाच्या आवडत्या श्रावणी सोमवारच्या दिवशी नागपंचमी येते तेव्हा त्याचे महत्त्व अधिकच वाढते.

Shravan Somwar And Nagpanchami 2023
Nag Panchami 2023 : नागपंचमीच्या दिवशी चपाती का बनवली जात नाही? जाणून घ्या कारणं

श्रावण महिन्याच्या पाचव्या सोमवारी नागपंचमी

सोमवार, 21 ऑगस्ट रोजी सावन महिन्यातील पाचवा सोमवार व्रत पाळण्यात येणार असून याच दिवशी नागपंचमीही पाळली जाईल. नागपंचमीला भगवान शिवाच्या नागाची पूजा करण्याचा विधी आहे. अशा स्थितीत या वर्षी भाविकांना एकाच दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची उपवास आणि पूजा (Pooja) करून दुहेरी आशीर्वाद मिळू शकणार आहेत. त्यामुळे हा दुर्मिळ योगायोग विशेष मानला जात आहे.

24 वर्षांनंतर श्रावणी सोमवारी नागपंचमी

21 ऑगस्ट 2023 रोजी, श्रावण महिन्याच्या 5 व्या सोमवारी नागपंचमी देखील असेल. यासोबतच या दिवशी अनेक शुभ योगही बनत आहेत. 21 ऑगस्टला शुभ नावाचा योग तयार होईल आणि चित्रा नक्षत्रही असेल. यंदा नागपंचमीचा सण अधिकमासानंतर आणि श्रावणी सोमवारी येत आहे . 24 वर्षांनंतर असा योगायोग घडल्याचे मानले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com