Satellite Internet: Wifi साठी नसणार केबलची गरज; थेट सॅटेलाईटद्वारे इंटरनेट पोहचणार घरा-घरात

Satellite internet: Jio आणि Oneweb या महिन्यात एका इव्हेंटमध्ये सॅटेलाइट इंटरनेटचा लाईव्ह डेमो देणार आहेत.
Satellite Internet
Satellite InternetSaam Tv
Published On

Satellite internet vs Cable Internet:

भारतात लवकरच सॅटेलाईटद्वारे इंटरनेट सर्व्हिस मिळणार आहे. म्हणजेच कसं तुमच्या घरावर डिश लावली तर टिव्हीवर सर्व चॅनल दिसत असतात. अगदी तसंच इंटरनेट मिळणार आहे. आपल्या घरात इंटरनेट घेण्यासाठी केबल किंवा टॉवरची गरज राहणार नाही. विशेष या इंटरनेटचे स्पीड जास्त असणार आहे. (Latest News)

या सुविधेसाठी चाचणीसाठी रिलायन्स जिओची सॅटेलाईट शाखा आणि वनवेबला दूरसंचार विभागानं मंजुरी दिलीय. सॅटेलाईटद्वारे कशाप्रकारे इंटरनेट सेवा देता, येईल याची माहिती या दोन्ही कंपन्या देतील. दरम्यान अॅमेझॉननेही दूरसंचार विभागाकडे भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्यास परवानगी मागितलीय. यामुळे आता सॅटेलाइट इंटरनेटच्या शर्यतीत अॅमेझॉन(Amazon),जिओ, वनवेब (OneWeb) आणि एलन मस्क यांची कंपनी स्टार लिंक Starlink कंपन्या आहेत.

का आहे सॅटेलाईट इंटरनेट

सॅटेलाईट इंटरनेट हे सॅटेलाईट टीव्ही सारखं काम करेल. हे एक वायलेस कनेक्शन आहे. जे सॅटेलाईटच्या मदतीने जमिनीवर असलेल्या डिशपर्यंत पोहचत असतं. त्यानंतर मॉडेमच्या मदतीने ते आपल्याला इंटरनेट सेवा देत असतं. यात रेडिओ लहरीच्या माध्यमातून कम्युनिकेशन करता येईल. ज्याप्रकारे तुम्ही डिश टीव्ही पाहण्यासाठी एका डिशच्या माध्यमातून नेटवर्कला पकडत असतं.

याचप्रमाणे सॅटेलाईट इंटरनेटसाठी एक डिश किंवा उपकरण तुम्हाला दिलं जाईल. याच्या माध्यमातून थेट नेटवर्क वायरलेस पद्धतीनं मिळवू शकतात. नेटवर्कसाठी कोणत्याच केबलची गरज नसते.

काय आहे फरक

सामान्य किंवा केबल इंटरनेटमध्ये हायस्पीड इंटरनेट डेटा हवा असेल तर तो आपल्याला केबल द्वारे मिळत असतो. जर ही केबल तुटली तर तुमची इंटरनेट सेवा बंद होत असते. परंतु सॅटेलाईट इंटरनेटमध्ये असं नसतं. यात केबलची गरज राहत नाही. तार किंवा टॉवरची सुद्धा यासाठी गरज नसते. तंत्रज्ञानात जमिनीपासून ते थेट स्पेसमध्ये इंटरनेट पाठवलं जातं. त्यानंतर तुमच्या घरात हे इंटरनेट डिशच्या माध्यामातून येत असतं.

केबलद्वारे घेण्यात येणारे इंटरनेटला भागाच्या मर्यादा असतात. परंतु सॅटेलाईटचे इंटरनेट तुम्हाला कुठेही मिळत असते. जर समजा तुम्ही एखाद्या शहरात राहत आहात आणि तुम्ही इंटरनेट घेतलं आणि दुसऱ्या गावाला गेलात तर त्या ठिकाणीही तुम्ही इंटरनेटची सेवा घेऊ शकतात.

हे 5G पेक्षा चांगल असेल का?

सेवा आणि स्पीडमध्ये ५ जी सॅटेलाईट इंटरनेट चांगलं असेल. कारण हे टॉप सेल्यूलर इंफ्रास्ट्रक्चरनं बनवण्यात आलंय. 5G जलदगतीने डेटा ट्रान्सफर करण्यास सक्षम आहे. परंतु ग्रामीण भागात जेथे हे सेवा उपलब्ध नसेल तर सॅटेलाईट इंटरनेट चांगलं काम करेल. दरम्यान सॅटेलाईट इंटरनेटची पुरेशी माहिती नाहीये. परंतु स्पीड टेस्टनुसार, यात तुम्हाला ५० एमबीपीएसपर्यंत डाऊनलोड स्पीड मिळेल. तर १४ ते २५ एमबीपीएसपर्यंत अपलोड स्पीड मिळू शकेल. अनेक वृत्तानुसार, एलन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेटचा स्पीड २०० एमबीपीएस असेल.

Satellite Internet
OnePlus चा 'हा' 5G फोन झाला स्वस्त, इंटरनेट वापरण्यासाठी मिळणार मोफत डेटा; जाणून घ्या काय आहे ओफर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com