Samudrik Shastra: ओठांमध्ये लपलेत मोठं मोठे राज; काय म्हणतं सामुद्रिक शास्त्र जाणून घ्या

Samudrik Shastra For Lips: ओठ हे कोणत्याही स्त्रीच्या सौंदर्याचे रहस्य असते. महिलांचे ओठ पाहूनही त्या महिलेचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेता येतं.
Samudrik Shastra: ओठांमध्ये लपलेत मोठं मोठे राज; काय म्हणतं सामुद्रिक शास्त्र जाणून घ्या
Samudrik Shastra on lips

सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीच्या ओठ पाहूनही त्या व्यक्तीचा स्वभाव आपण सहज ओळखू शकतो. प्रत्येक व्यक्तीची शरिर रचना वेगळी असते. प्रत्येक शरिराचा भागाचा आकार हा वेगळा असतो. कोणाचे पातळ ओठ असतात तर कोणाचे जाड ओठ असतात. सामुद्रिक शास्त्राच्या मदतीने आपण व्यक्तीच्या ओठांवरून त्याचे व्यक्तीमत्व जाणून घेऊ शकतो.

ओठ हे कोणत्याही स्त्रीच्या सौंदर्याचे रहस्य असते. महिलांचे ओठ पाहूनही त्या महिलेचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेता येतं. सामुद्रिक शास्त्र हे एक असे शास्त्र आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा रंग, रूप, पोत आणि रचना पाहून त्याचे व्यक्तिमत्व, वागणूक आणि स्वभाव जाणून घेता येते.

जाड ओठ असतील तर

समुद्र शास्त्रानुसार ज्या महिलांचे वरचे ओठ जाड असतात त्या खूप महत्वाकांक्षी असतात. तसंच त्या स्त्रिया नेहमी आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचा विचार करतात. तसेच या महिला एकट्याने जीवन जगण्याचा विचार करत असतात. ज्या महिलांचे ओठ जाड असतात, त्या महिलांना गर्दीच्या ठिकाणी जाणे आवडत नाही. त्यांना आयुष्यात आनंदी राहण्याची सवय असते. तसेच त्यांना इतरांच्या जीवनाशी काही देणेघेणे नसतं.

मोठे ओठ

सामुद्रिकशास्त्रानुसार, ज्या लोकांचे मोठे ओठ असतात ते वैभवशाली जीवन जगत असतात. हे लोक चैनीच्या वस्तूंचे शौकीन असतात. तसेच ते त्यांच्या कामात अतिशय चपळ असतात. मोठे ओठ असलेल्या लोकांना प्रवास करायला आवडतो. तसंच हे लोक कोणाशीही पटकन मैत्री करतात.हे लोक नेतृत्व करण्यात खूप पारंगत असतात. त्यांच्याबद्दल एक खास गोष्ट म्हणजे हे लोक बोलण्यात पटकळ असतात. ते सहज उघडपणे बोलत असतात, मग समोरच्याला वाईट वाटले तरी.

बारीक ओठ

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांचे ओठं हे बारीक आणि स्लीम असतात. हे लोक खूप संवेदनशील असतात. ते त्यांच्या करिअरबाबत खूप सावध असतात. समुद्र शास्त्रानुसार बारीक ओठ असलेल्या लोकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. यातील विशेष गोष्ट म्हणजे हे दिसण्यास आकर्षक असतात यासह हे लोक प्रामाणिक असतात. बारीक ओठ असलेले लोक व्यवसायात आपलं डोकं लावत असतात. या लोकांचा विनोदी स्वभाव असतो.

Samudrik Shastra: ओठांमध्ये लपलेत मोठं मोठे राज; काय म्हणतं सामुद्रिक शास्त्र जाणून घ्या
Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com