Robotic Surgery Training Center : आता रोबोट करणार मानवाची सर्जरी, AIIMS मध्ये लवकरच सुरु होणार रोबोटिक प्रशिक्षण केंद्र

New Delhi Robotic Surgery Training Center : दिल्लीच्या SET येथे अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक्स प्रशिक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
Robotic Surgery Training Center
Robotic Surgery Training CenterSaam Tv
Published On

AIIMS-New Delhi : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्लीच्या SET येथे अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक्स प्रशिक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ही सुविधा AIIMS-New Delhi आणि 'India Medtronic Pvt Ltd' यांच्यातील सार्वजनिक-खाजगी मिळून आहे, जी Medtronic Plc ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

हे केंद्र सर्जन्‍सना रोबोटिक-असिस्‍टेड सर्जरीमधील दर्जात्‍मक प्रशिक्षण देईल. सप्‍टेंबर २०२१ मध्‍ये भारतात (India) पहिल्‍यांदा सादर करण्‍यात आलेली मेडट्रॉनिकची ह्युगो TM रोबोटिक-असिस्‍टेड सर्जरी (आरएएस) सिस्‍टमचा वापर करणारे एम्‍स येथील हे पहिलेच केंद्र आहे.

Robotic Surgery Training Center
Career In Architecture: आर्किटेक्टमध्ये करिअर करायचे आहे ? शिक्षणाची अट किती ? पगार व फी किती ? जाणून घ्या

एम्‍स येथील पेडिएट्रिक सर्जरीचे विभागप्रमुख व डीन अकॅडेमिक्‍स डॉ. मिनू बाजपेयी आणि मेडट्रॉनिक इंडियाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक मायकेल ब्‍लॅकवेल यांच्या उपस्थितीत नवीन प्रशिक्षण सहयोगाची घोषणा करण्‍यात आली. हा सहयोग देशभरातील सर्जन्‍सना प्रशिक्षित करण्‍यासाठी आणि आरएएसच्‍या लाभांची उपलब्‍धता वाढवण्‍यासाठी नवीन तंत्रज्ञान (Technology) आणि दशकांच्‍या सर्जिकल कौशल्‍यांना एकत्र आणण्याची उद्देशाने केला आहे.

1. कसे असेल रोबोटिक प्रशिक्षण

  • हे प्रशिक्षण केंद्र मुलभूत कौशल्य प्रशिक्षणापासून ते प्रक्रियात्मक प्रशिक्षणापर्यंत, तसेच सॉफ्ट-टिश्यू सर्जरीमधील अधिक प्रगत व विशेष क्षेत्रांपर्यंत आरएएसमधील ज्ञान आणि कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षणाचा विस्तृत स्पेक्ट्रम प्रदान करेल.

  • हे प्रशिक्षण देशभरातील सर्जन, सहकारी आणि रहिवाशांमध्ये सर्जिकल रोबोटिक्सचा वापर करून प्रक्रियात्मक ज्ञान कौशल्ये प्रदान करण्यास मदत करेल.

  • मेडट्रॉनिकचा एम्‍ससोबतचा सहयोग आरएएसचे फायदे भारतातील अधिकाधिक रुग्णांना उपलब्‍ध करून देण्‍याप्रती AIIMS कटिबद्धतेचा आधारस्‍तंभ आहे.

  • आम्‍ही आधुनिक तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण व शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देऊ आणि सर्जन्‍सच्‍या विद्यमान व भावी पिढीचे कौशल्‍य अधिक निपुण करू असे मेडट्रॉनिक इंडियाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक मायकेल ब्‍लॅकवेल म्‍हणाले.

Robotic Surgery Training Center
Career As Chef : चमचमीत पदार्थ बनवायला आवडतात ? शेफ बनण्याची इच्छा आहे ? कसे निवडाल करिअर ? शिक्षणाची अट, पगार किती ?

2. डॉक्टरांना कशी होईल मदत

  • रोबोटिक-असिस्‍टेड सर्जरी सर्जन्‍सना पांरपारिक टेक्निक्‍सच्‍या तुलनेत अधिक अचूकता, स्थिरता व नियंत्रणासह गुंतागूंतीच्‍या प्रक्रिया करण्‍याची सुविधा देते.

  • सर्जिकल रोबोट्स अनेक वर्षांपासून कार्यरत असले तरी विविध घटकांमुळे त्‍यांचा अवलंब मर्यादित आहे, त्यापैकी एक घटक म्‍हणजे प्रशिक्षण.

  • सर्जिकल रोबोटिक्‍स व आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स सर्जिकल केअर दिल्‍या जाण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल घडवून आणत आहेत.

  • हा उपक्रम सर्जन्सना ओपन व लेपरोस्‍कोपिक सर्जरीला प्रगत आरएएसमध्‍ये बदलण्‍यास साह्य करेल आणि रोबोटिक टेक्निक्‍समध्‍ये निपुण होण्‍याचा त्‍यांचा अध्‍ययन काळ कमी करेल, असे एम्‍सचे पेडिएट्रिक सर्जरीचे विभागप्रमुख व डीन अकॅडेमिक्‍स डॉ. मिनू बाजपेयी म्‍हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com