Right Posture For Sleeping : चुकीच्या झोपण्याच्या सवयींमुळे जडू शकतात 'हे' आजार, वेळीच व्हा सावध !

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फक्त चांगली झोप घेणे पुरेसे नाही तर...
Right Posture For Sleeping
Right Posture For SleepingSaam Tv

Right Posture For Sleeping : काहींना कामाच्या थकव्यामुळे लगेच झोप लागते तर काहींना लागत नाही. दिवसभर थकल्यानंतर छान झोप पूर्ण झाल्यावर अनेकांना फ्रेश वाटू लागते. ऑफिसचे टेन्शन, दिवसभराची धावपळ आणि थकवा यानंतर माणसाला फक्त चांगली झोप लागते.

थकल्यानंतरही अनेकांना बेडवर पडूनही झोप येत नाही. ते कधी एका स्थितीत झोपतात, तर कधी दुसऱ्या स्थितीत. यामध्ये त्यांचा बराच वेळ वाया जातो. आरोग्य (Health) चांगले ठेवण्यासाठी फक्त चांगली झोप घेणे पुरेसे नाही, तुमची झोपण्याची स्थितीही योग्य असली पाहिजे, अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

काही लोकांना सरळ झोपायला आवडते, तर काही लोकांना पोटावर झोपणे अधिक आरामदायक वाटते. यामुळे झोपेचा त्रास तर होतोच पण चुकीच्या पद्धतीने झोपल्यावर शरीरावर वाईट परिणाम होतो. झोपण्याची योग्य स्थिती आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. आता झोपण्याची योग्य स्थिती कशी असायला हवी हे समजून घेऊया.

Right Posture For Sleeping
Sleep: वयानुसार बदलते झोपेची वेळ, जाणून घ्या तुमच्या झोपेचं गणित

1. पोटावर झोपणे

अनेकांना पोटावर झोपायला आवडते. त्यात त्यांना अधिक आराम मिळतो. परंतु या स्थितीत झोपल्याने रक्त प्रवाह कमी होणे, मणक्यातील समस्या अशा अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय पाठदुखी आणि नसांशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते.

2. पाठीवर झोपणे

ही झोपेची सर्वात सामान्य स्थिती आहे. जर तुम्ही बेडवर सरळ झोपत असाल तर ही स्थिती खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे खांदे, पाठ आणि नाक दुखणे तर दूर होतेच, पण अॅसिड रिफ्लक्ससारखे आजारही (Disease) बरे होतात. गर्भवती महिलांसाठी ही झोपेची ही स्थिती सगळ्यात चांगली मानली जाते.

Right Posture For Sleeping
Feeling Sleepy After Lunch : दुपारच्या जेवणानंतर झोप येते ? खाण्याच्या 'या' गोष्टींवर नियंत्रण ठेवा !

3. फेटल पोजिशन

फेटल पोजिशन ही सर्वात आरामदायक आणि सर्वोत्तम मानली जाते. यामध्ये एखादी व्यक्ती गर्भासारखी स्थितीत झोपते. यामुळे कंबरेला आणि पायांना आराम मिळतो. यासोबतच घोरण्याची समस्याही दूर राहते. तुम्हालाही चांगली झोप घ्यायची असेल, तर या स्थितीत नक्की झोपण्याचे ट्राय करा

4. सतत कुस बदलणे

सतत कुस बदलत झोपणे हे देखील सगळ्यात चांगले मानले जाते. यामुळे मणक्याचा त्रास देखील होत नाही. यासोबतच मान, खांदे आणि पाठीलाही आराम मिळतो. डाव्या बाजूला झोपणे चांगले मानले जाते. त्यामुळे झोपेच्या वेळी रक्तप्रवाह व्यवस्थित होऊन झोप चांगली लागते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com