

कॉर्पोरेट जगात 'Revenge Quitting' सूडबुद्धीने राजीनामा देण्याचा नवा ट्रेंड
अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून अचानक नोकरी सोडण्याचा नवा ट्रेंड
२०१८ मध्ये युरोप आणि अमेरिकेत हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसून आला होता.
आताचं जग सारं बदलंय. बदलत्या काळानुसार आपली जीवनशैली आणि कार्यसंस्कृती देखील पूर्णपणे बदलू लागलीय. आधी कर्मचारी आपल्या कामाविषयी एकनिष्ठ असायचे, परंतु आता बदलेल्या जगात निष्ठेने काम करणारे कर्मचारी मिळत नाहीयेत. त्यात कॉर्पोरेट जगात नोकरी बदलण्याचं अन् रागानं नोकरी सोडण्याचं प्रमाण वाढलंय. हो, कॉर्पोरेट जगात आता 'Revenge Quitting' सूडबुद्धीने राजीनामा देण्याचा नवा ट्रेंड सुरू झालाय.
अनेकदा बॉस ऑफिसमध्ये कामावरून टोमणे आणि फटकारत असतो. कर्मचाऱ्यांवर आगपाखड करत असतो. परंतु बॉस का रागवत आहे. कामाचा एक भाग म्हणून समजून घेणं. किंवा काहीतरी शिकण्याच्या दृष्टीने कोणी त्याकडे पाहत नाही. पण कर्मचारी राग किंवा अपमान समजून बदला घ्यायच्या हेतूनं अचानक नोकरी सोडतात. या ट्रेंडला कॉर्पोरेट भाषेत (Revenge Quitting') ''सूडबुद्धी राजीनामा" असे संबोधले जात आहे. आजचा आपण हे ट्रेंड काय आहे, हे जाणून घेऊ.
नावाप्रमाणेच, 'सूड घेणं ' म्हणजे राग किंवा अपमानाचा बदला घेण्यासाठी नोकरी सोडणं हा कॉर्पोरेटमधील नवा ट्रेंड. प्रचंड संतापाचा ईमेल पाठवून किंवा अचानक राजीनामा देऊन राग व्यक्त करणे याला ' सूडबुद्धी राजीनामा ' Revenge Quitting म्हणतात. ही प्रवृत्ती तरुणांमध्ये बघायला मिळत आहे. सोशल मीडियामुळे ही प्रवृत्ती अधिक बळावत आहे. २०१८ मध्ये युरोप आणि अमेरिकेत हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसून आले.
यात अनेकजणांनी संताप व्यक्त करणारे ईमेल सोशल मीडियावर व्हायरल केले होते, त्याचाच आता ट्रेंड बनलाय. कोरोना या साथीच्या आजारानंतर असं संतापाचे ईमेल करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले. २०२१-२२ मध्ये अमेरिकेतील लाखो लोकांनी कामाचा ताण आणि मानसिक ताणामुळे अचानक नोकऱ्या सोडल्या आहेत.
हा ट्रेंड वाढण्याचं कारण म्हणजे, कर्मचारी त्यांच्या बॉसच्या वागणुकीमुळे आणि ऑफिसच्या वातावरणाला कंटाळलेले असतात. क्लायंटकडून किंवा कंपनीमध्ये होणारा अपमान, वाढलेला कामाचा ताण आणि मानसीक ताण ही देखील याची प्रमुख कारणे आहेत. एका जागतिक सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे, २०२३ मध्ये सुमारे ५०टक्के कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या सोडू इच्छित आहेत. तर १६ टक्के तरुणांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय.
राग किंवा भावनेच्या भरात अशा प्रकारे नोकरी सोडणं तात्पुरत्या काळासाठी चांगलं वाटू शकते. मनाला बरे वाटले , मोकळ वाटू शकतं. पण ते तुमच्या करिअरसाठी चांगले नाहीये. यामुळे तुमची प्रोफेशनल प्रतिमा खराब होऊ शकते. हे करणे हा एक-वेळचा उपाय ठरू शकतो, परंतु ते वारंवार करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
अचानक नोकरी सोडणं हा तुमचा निर्णय असू शकतो. तुम्ही तुमचं मत कधीही व्यक्त करू शकत नाही. परंतु जर सूड घेणे हाच नोकरी सोडण्याचे कारण असेल तर तुम्ही इतर पर्यायांचा अवलंब देखील करू शकता. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेण्याऐवजी, तुमची बाजू एचआर किंवा तुमच्या मॅनेजरसोबत मांडा. जर यामुळे समस्या सुटली नाही, तर राजीनामा द्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.